________________
कारनामा
CENSE
(३८२)
उपाध्याय विनयविजयजी पुढे सांगतात की, ज्याच्यासाठी तू प्रयत्न करतो, विविध प्रकारच्या भयाने आतंकित होतो. कधी आनंदी होऊन नाचतो तर कधी उदासिनतेने व्याकूळ होतो. मनोवांछित मिळाल्यावर आनंदित होतो. परंतु आपल्या निर्मळ स्वभावाचा घात करून तू ज्या वस्तूंमागे वेडा झाला आहेस ते सर्वकाही 'पर' आहे. तुझे काहीच नाही.१७६
येथे उपाध्यायजींच्या सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की आज मानव अर्थ आणि काम या पुरुषार्थांमागे वेडा झाला आहे. ते प्राप्त झाल्यावर सुद्धा तो कधी हर्षित होतो तर कधी भयभीत होतो. कधी उदास होतो तर कधी प्रसन्न होतो. जर जीवात्म्याने एकत्व आणि अन्यत्व भावना समजून घेतली तर तो द्वंद्वांमुळे व्याकुळ होणार नाही. जीवन शांत, स्वस्थ आणि व्याकुळतारहित होईल.
ज्याला जड आणि चैतन्याचे भेदज्ञान असते तोच सम्यग् दृष्टी होतो. श्री दशवैकालिक सूत्रात लिहिले आहे -
जो जीवेऽवि न याणइ, अजीवेऽवि न याणइ ।
जीवा जीवे अयाणन्तो. कह सो नाहिउ संमजं ॥१७७ ज्याला जीवाचे ज्ञान नाही, अजीवाचे नाही, जीव-अजीव दोन्हींचे ज्ञान नाही त्याला संयमाचे ज्ञान कसे होईल ?
जीव-अजीव, आत्मा-अनात्मा जड-चैतन्य यांना न जाणणे म्हणजे केवळ बहिरात्म दशा आहे. बहिरात्म दशेचा अर्थ फक्त पौद्गलिक वैषयिक जीवन जगणे असा आहे.
_ 'अन्यत्व भावना' केवळ आत्मार्थी जीवासाठीच उपयुक्त अथवा चिंतनीय आहे असे नाही. भौतिक, पौद्गलिक पदार्थांच्या रागी जीवांसाठीसुद्धा तितकीच उपयुक्त आणि विचारणीय आहे. अनेक मानसिक आजाराचे कारण पौद्गलिक राग, विषयराग, भय, शोक, काम, क्रोध इत्यादी आहे. ह्या आजाराचे मूळ राग, द्वेष हे आहे. ह्या मूळांना उखडण्यासाठी विचार केला पाहिजे. चिंतन केले पाहिजे की ज्ञान, दर्शन, चारित्रमय आत्म्याशिवाय सर्व पदार्थ 'पर' आहेत. 'अन्य' आहेत ह्या विचाराला दृढ करून आपल्या आत्महितासाठी आत्मकल्याणासाठी प्रयत्न केला पाहिजे.१७९
जीवन व्यवहारात ज्ञान, दर्शन, चारित्र्य यांचे आचरण आवश्यक आहे. आणि त्याचे आचरण तेव्हाच होऊ शकेल जेव्हा जीवनात आकांक्षा कमी होते. जीवनात जे