________________
(३७४)
मिळणार ? ती प्राप्त करण्यासाठी आंतरबाह्याचे भेदज्ञान होणे फार जरूरीचे आहे.
समयसार कलशामध्ये भेदविज्ञानाचे महत्त्व दाखविण्यासाठी लिहिले आहे "पूर्वी जे जे सिद्ध झाले, मोक्षाला गेले ते सर्व आत्मा आणि पुद्गल भिन्न आहे अशा भेद विज्ञानाद्वारे सिद्ध झाले आहेत आणि जे सांसारीक बंधनाने बद्ध आहेत ते सर्व भेदविज्ञानाच्या अभावाने बद्ध आहेत. १५८
"
मनुष्य कितीही ज्ञानी असला, अकरा अंग, बारा उपांग, चौदा पूर्वाचा जरी ज्ञाता असला तरीसुद्धा भेदज्ञान अथवा अन्यत्वभावनेशिवाय मुक्त होऊ शकत नाही आणि ज्याला काहीच ज्ञान नाही पण फक्त आत्मा आणि शरीराच्या भिन्नतेचे ज्ञान झाले तरी तो लवकर मुक्त होतो.
ह्याचे उदाहरण देताना कुंदकुंदाचार्यांनी लिहिले आहे की, 'शिवभूती नामक परमबैरागी जीवाने गुरूजवळ दिक्षा घेऊन महान तपश्चरण सुरू केले. परंतु गुरूजवळ शाखज्ञान प्राप्त करण्याइतका अथवा ज्ञान ग्रहण करण्याइतका क्षयोपशम त्यांचा नव्हता, गुरूंनी त्यांना 'मा रुष, मा तुष' इतकेच शब्द शिकविले. हे शब्द तो पुन्हा पुन्हा उच्चारू लागला. उच्चार करता करता ते शब्द सुद्धा शुद्ध राहीले नाहीत. परंतु 'तुष माष' ध्यानात राहीले त्याचेच तो उच्चारण करू लागला.
एकदा एक महिला सुपाने उडीद साफ करीत होती. तिला पाहून मुनींनी विचारले, "बाई, तू काय करत आहेस ? तेव्हा बाईने सांगितले, 'तुष- माष' वेगळे करीत आहे. " अर्थात सालपट आणि उडीद वेगळे करते. हे ऐकून मुनींच्या चित्तामध्ये असा अर्थ स्फुरीत झाला की माष म्हणजे उडीद, तुष म्हणजे सालपट. जसे वेगवेगळे आहे तसेच साररूप आत्मा आणि असार असे शरीर दोन्ही वेगवेगळे आहेत अशा भावनेने 'तुष माष भिन्न' असे घोकत असताना त्यांना आत्म्याचा अनुभव झाला. आत्मभावनेत एकाग्र होताच, आत्म्यात लीन होताच घाती कर्माचा नाश करून मुनी केवलज्ञानी झाले. ' १५९
भेदज्ञानाचा सरळ आणि साधा अर्थ आपल्या आणि परक्याचे भेदज्ञान करणे आहे. आपल्याहून 'पर'ची भिन्नता कळल्यावरच भेदज्ञान होते. जो 'पर' वस्तू आणि 'पर' भावाला सुद्धा 'स्व' स्वरूपी समजतो त्याला भेदविज्ञान होत नाही. ज्ञान आणि राग दोघांचा वेगळेपणा समजणे भेदविज्ञान आहे. भेदज्ञान प्रकट झाल्यावर रागाची अशुद्ध परिणती वेगळी व गुण वेगवेगळे अनुभवले जातात. जसे पाणी आणि चिखल जेव्हा एकत्रित मिसळलेले असतात तेव्हा असा अनुभव केला जातो की चिखल आणि पाणी वेगळे आहे. पाणी