________________
(३७५)
आपल्य शुद्ध स्वरूपात स्थित आहे. त्याचप्रमाणे संसारावस्थेत जीव कर्मबद्ध पर्याय रूपाने एक क्षेत्रात मिळालेला आहे. अशा अवस्थेत जर शुद्ध स्वरूपाचा अनुभव केला गेला तर समस्त कर्म जीवस्वरूपापेक्षा भिन्न आहे असे ज्ञान होईल आणि भेदज्ञानाने शुद्ध आत्म्याची उपलब्धी होईल.
___ ज्याला भेदज्ञान झाले आहे तो जाणतो की, 'आत्मा कधीच ज्ञान स्वभावाहून वेगळा राहत नाही.' असे जाणल्याने तो कर्मोदयाने तप्त झाला तरी राग, द्वेष, मोह इत्यादींपासून पराभूत होत नाही. तो निरंतर शुद्ध आत्म्याचा अनुभव करतो. परंतु ज्याला भेद ज्ञान झालेले नाही तो आत्मा आत्म्याच्या ज्ञानस्वभावाला जाणत नसल्याने रागालाच आत्मा मानतो आणि त्यामुळे तो रोगी द्वेषी, मोही बनतो. त्यामुळे कधी शुद्धात्म्यांचा अनुभव करीत नाही. म्हणून हे निश्चित आहे की भेदज्ञानानेच आत्म्याची उपलब्धी होते.१६०
अन्यत्वभावनेमध्ये आत्मा, अनात्मा काय आहे त्याचे विश्लेषण केलेले आहे. आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळे आहे. जसे तूप आणि तूपाचे पात्र ह्या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत तसेच शरीर तूपाचे पात्र आहे आणि आत्मा तूपासारखा आहे. दोन्ही परस्पर सहयोगी आहेत. दोघांचा आधारआधेय संबंध आहे. परंतु तो कर्मामुळे आहे. शरीर आणि आत्म्याचा संबंध वास्तविक नाही परंतु कर्मकृत आहे. कर्मामुळे संबंध घडतात आणि तुटतात.
अन्यत्व भावनेचे चिंतन एकाप्रकारे हंसविवेक आहे, पृथःकरण बुद्धी आहे. जी जड आणि चैतन्याचा वेगवेगळा अनुभव करविते. अशुद्धीपासून शुद्धीकडे घेऊन जाते, वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान ह्या अन्यत्व भावनेने होते.१६१
जीव आणि पुद्गल, शरीर आणि आत्मा, स्व आणि पर यातील भेद समजण्यासाठी अन्यत्वभावना एक बळ देते. ज्यांना पाहता साधक अनुभव करतो की माता-पिता, भाऊ, पत्नी, कुटुंबातील लोक कोणीच आपले नाहीत. ते आपापल्या कामापुरते A त्यांच्याबरोबर व्यवहार ठेवतात.१६२
सारांश हा आहे की ह्या सगळ्या संबंधांच्या मागे आपला आपला स्वार्थ आहे. जेव्हा स्वार्थ संपतो तेव्हा कोणी कोणाचे राहत नाही. इतकी विचित्र परिस्थिती होते की ज्यांना मनुष्य, मित्र, पुत्र, हितचिंतक समजतो ते शत्रू आणि दुष्चिंतक बनतात. संसारामध्ये हे सर्व काही प्रत्यक्ष आहे. स्वार्थवश पिता-पुत्राची हत्या करतो, भावाभावांमध्ये युद्ध