________________
(३७३)
एकत्व भावनेमध्ये दृष्टी एकमेव आत्म्याबरोबर जोडलेली राहते. असे होणे अत्यंत कठीण आहे. मनाला त्या दिशेने वळविण्यासाठी खूप पुरुषार्थ करावा लागतो. अन्यत्वभावना त्या दिशेत पुढे जाण्यासाठी एक आधाररूप आहे.
एकत्वभावनेमध्ये मनुष्य चिंतन करतो की,
"एगो मे सासओ अप्पा नाण दंसण संजुओ ।" एक माझा आत्मा शाश्वत आहे. ज्ञान दर्शनयुक्त आहे. अन्यत्व भावनेत मनुष्य विचार करतो की,
"सेसा में बाहिरा भावा सव्व संजोग लक्खणा ।।'१५७
आत्मगुणांच्या अतिरिक्त जे काही बाह्य भाव आहेत, (अर्थात जड पुद्गल पदार्थ आणि दृश्यमान पदार्थ) ते सर्व संयोग लक्षणयुक्त आहेत.
अन्यत्व भावना सम्यग्दर्शनाचा पाया आहे. ह्या भावनेला 'विवेकभावना' सुद्धा म्हणतात अथवा 'भेदविज्ञान' असेही म्हटले जाते. शरीर आणि आत्मा यांच्या भिन्नतेची भावना पुष्ट झाल्यावर मोह ग्रंथी तुटते आणि सहजच मन स्थिर होते.
एकत्व भावनेमध्ये आत्मनिरीक्षण करण्याचे सूचित केले गेले आहे. आणि अन्यत्व भावनेमध्ये बाह्यचे वास्तविक दोन्हींचे लक्ष्य आणि परमध्येय आत्म्याची प्रगती आत्मविकासच आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहणे आवश्यक आहे. अन्यत्व भावनेमध्ये आत्म्याला सोडून बाकी सर्व 'अन्य' समजल्यावर बाह्य पदार्थांमध्ये काय सार रूप आहे, काय असार आहे हे समजून आंतरआत्म्यामध्ये प्रवेश करून शुद्धात्म भावाला प्रकट करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
आज मनुष्य बाह्य जगात अनेक प्रकारचे संशोधन करण्यात व्यस्त आहे. आकाशातले तारे मोजण्याची, चंद्र आणि मंगळावर पोहचण्याची वेगवेगळ्या रूपाने जीवनामध्ये काही ना काही प्रयत्न करतच राहतो. त्यात एकत्व आणि अन्यत्व काय आहे ? शाश्वत अशाश्वत काय आहे ह्याचा विचार करण्यासाठी देखील त्याच्याकडे वेळ नाही.
अशा परिस्थितीत कसे खावे, कसे प्यावे, कसे बोलावे कसे चालावे ह्याचे ज्ञान त्याला होत नाही. जीवन इतके अस्ताव्यस्त झाले आहे की जणू तो वेड्यांच्या दवाखान्यात आहे आणि जिकडे तिकडे तोड-फोड करत आहे. अशा स्थितीत सुख-शांती कोठून