________________
(३७२)
आसक्ती द्वैतामुळे उत्पन्न होते. अद्वैताची भावना पुष्ट झाल्यावर ती विलीन होते. " तत्र को मोहः ? कः शोकः एकत्वमनुपश्यतः" अर्थात जो एकत्वाला पाहतो तेथे शोक कसला व मोह कसला ?
एकत्वाच्या भावनेचा अभ्यास दृढ झाल्यावर शरीर, उपकरण इत्यादींवर होणारी आसक्ती क्षीण होते. १५६ संयोग हे व्यावहारीक सत्य आहे. आपण त्याचे अतिक्रमण करू शकत नाही. परंतु ह्या वास्तविकता सुद्धा विसरू शकत नाही की शेवटी आत्मा हा सर्वापेक्षा वेगळा आहे. ह्या भेदज्ञानाच्या अनुभूतीला पुष्ट करून साधक देहात राहत असूनही देहाच्या बंधनातून मुक्त होतो आणि जो देहात राहूनही देहातीत दशेला प्राप्त झाला आहे अशा व्यक्तींना श्रीमद् रामचंद्रजी आपल्या आत्मसिद्धी पदामध्ये त्यांना अगणित वंदन करताना म्हणतात
देह छता जेणी दशा वरते देहातीत ।
ते ज्ञानी ना चरण मा हो वंदन अगणित ||
अन्यत्व भावना
एकत्वाचा दुसरा पक्ष अन्यत्व आहे. एकत्वाची जेव्हा व्याख्या केली जाते तेव्हा एकाकीपणाचे ध्यान ठेवले जाते. त्या एकाशिवाय अन्य सर्व गौण होतात. अन्यत्वभावनेत एकत्वाला दृढ करण्यासाठी अन्यत्वाला सामोरे ठेवले जाते.
Compress musleyson
1-3-09
एकत्व भावना स्वमुखी, आत्मोन्मुखी, विधिपरक आहे. तेव्हा अन्यत्व भावना अन्यमुखी विधिपरक आहे. एकत्व भावनेत एकाचे विवेचन मुख्य आहे अन्यत्वभावनेत 'एका'च्या अतिरिक्त 'अन्य' चे विवेचन मुख्य आहे.
एकत्वभावनेत 'विधिरूप (Positive ) ' चिंतन केले जाते. तर अन्यत्व भावनेत 'निषेधरूप (Negative ) ' चिंतन केले जाते. एकत्वभावनेचे रहस्य अंतरंग निरीक्षण, आत्मपरीक्षण आहे. अन्यत्व भावनेला बाह्यचिंतन ( Circumspection ) म्हटले जाते. हे क्रमशः subjective आणि objective आहे.
स्व-स्व आहे पर-पर आहे. परंतु चूक अशी होते की प्राणी 'पर'ला 'स्व' मानतो. त्याच्या परिणामस्वरूपी स्वमुखता नष्ट होते आणि परोन्मुखता वाढत जाते. परोन्मुखता वैभाविक दशा आहे. आत्म्याचा 'पर' भाव आहे, तिरस्कार आहे, अपमान आहे ह्यातून सुटण्यासाठी 'पर'ला 'पर' समजले पाहिजे.