________________
बसलेल्या मनुष्यालासुद्धा तसेच दिसत असते. परंतु ज्यावेळी गाडी थांबते त्यावेळी तुमच्य लक्षात येते की मी जे काही पाहिले तो केवळ एक आभास होता.
(३७१)
- २) व्यावहारीक सत्य - व्यवहार करण्यासाठी एक निश्चित प्रकारचा संकेत केला जातो. विशिष्ट परिस्थिती अथवा व्यवस्था निर्माण केली जाते त्याला व्यावहारीक सत्य म्हणतात अथवा जे भूतकाळात नव्हते, भविष्यात नसेल परंतु वर्तमानकाळात आहे त्याला 'व्यावहारीक सत्य' म्हणतात. जसे आपले शरीर हे व्यावहारीक सत्य आहे. आपल्या जन्मापूर्वी हे शरीर आपल्याबरोबर नव्हते, आपण मेल्यानंतर हे शरीर आपल्याबरोबर राहणार नाही तरी सुद्धा वर्तमानामध्ये हे शरीर आपल्याजवळ आहे हे व्यावहारीक दृष्टीने सत्य आहे. वर्तमानात ह्या नावाने आपला व्यवहार चालतो म्हणून ते व्यावहारीकदृष्टीने उपयुक्त आहे.
अशाचप्रकारे वर्तमानामध्ये आई-वडील, मामा-मामी, भाऊ-बहीण इ. जे संबंध आहेत ते व्यावहारीक सत्य आहे. हे कामापुरते संबंध ह्या वर्तमान जीवनासाठी उपस्थित झालेले आहेत. जरी ह्या संबंधांना जपावे लागले तरी वास्तविकता लक्षात घेऊनच सांभाळले पाहिजे.
३) पारमार्थिक सत्य जे भूतकाळात होते, वर्तमानकाळात आहे आणि भविष्यकाळात सुद्धा राहील ते पारमार्थिक सत्य आहे. शरीर हे व्यावहारीक सत्य आहे तर ह्या शरीरात असलेला आत्मा हे पारमार्थिक सत्य आहे. हा आत्मा या जन्मापूर्वी सुद्धा होता, ह्या जन्मातसुद्धा आहे आणि पुढच्या जन्मातसुद्धा असेल. आत्म्याचा स्वभाव, रूप, अनंतज्ञान, दर्शन इत्यादी गुणही पारमार्थिक सत्य आहे.
-
येथे हे समजले पाहिजे की व्यावहारीक सत्याला सांभाळता सांभाळता पारमार्थिक सत्य गौण होता कामा नये. ह्याचे सतत ध्यान ठेवण्यासाठी एकत्व भावनेचे चिंतन केले पाहिजे.
होतो.
ज्यांना व्यावहारीक संबंधामध्ये आपल्या स्वतंत्र आस्तित्वाची अनुभूती होते तो बाह्य संकटांचा सामना करत असूनही अंतःकरणाने समस्यांपासून मुक्त राहतो. बाह्य वातावरणात, समुहात राहत असतानासुद्धा तो अंतःकरणाने एकटाच राहतो आणि बाह्य जीवनात व्यस्त राहत असूनही अंतःकरणात व्यस्ततेपासून मुक्त राहतो.
संसारात राहूनही संसारापासून मुक्त राहण्याचा बोध ह्या एकत्व भावनेने प्राप्त