________________
(३७०)
समाप्त होतात त्या वृक्षाला पक्षी सोडून जातात. जो तलाव शुष्क होतो त्याला सारस सोडून जातात, ज्या पुरुषाजवळचे पैसे समाप्त होतात त्यांना गणिका सोडून देतात, पदभ्रष्ट राजाला मंत्री सोडून देतात, वाळलेल्या फुलाला भ्रमर सोडून देतात, जे जंगल जळून जाते त्याला पशू सोडून देतात. अशाप्रकारे आपण प्रत्यक्षच पाहतो की सर्व प्राणी कार्यवश अथवा स्वार्थवश परस्परांवर प्रेम करतात. स्वार्थ सिद्धीची जर संभावना नसेल तर आपल्यावर उपकार करणाऱ्याला सुद्धा व्यक्ती सोडून देतो म्हणून जगात कोणी कोणाचे नाही.१५३
ह्या एकत्व भावनेला वाचल्यानंतर व्यक्ती विचार करतो की, ज्या आईने आपल्याला जन्म दिला, पित्याने मोठे केले, शिकविले त्या स्वजनांबरोबर मित्रांबरोबर राहताना सुद्धा 'मी एकटाच आहे' असे विधान कसे करता येईल.
व्यावहारिक भाषेत असे सांगता येत नाही. आपल्याला दोन्ही प्रकारचे जीवन जगले पाहिजे. व्यावहारीक जीवन सुद्धा जगले पाहिजे कारण त्याशिवाय आपण आपली आवश्यकता पूर्ण करू शकणार नाही. आपण स्वतःसाठी जगण्याचे साधन एकत्रित करू शकणार नाही. जर व्यवहारातही "मी एकटाच आहे" असे म्हटले तर कोणी जेवण वाढणारा मिळणार नाही, पाणी पाजणारा मिळणार नाही, कोणी सेवा करणारे मिळणार नाहीत किंवा कोणी घेणारा आणि देणारा मिळणार नाही. म्हणून व्यावहारीक व सामाजिक जीवन जगणे अत्यंत जरूरीचे आहे. तसेच जर आपण निश्चय जीवन जगले नाही तर तो व्यवहार आणि समाज आपल्यासाठी डोकेदुःखी निर्माण करून टाकेल. व्यावहारीक जीवन जगतांनाही निश्चय जीवनाच्या पृष्ठभूमीचे चिंतन अत्यंत अपेक्षित आहे.१५४
___ तसेच व्यवहाराबरोबर आणि पृष्ठभूमीमध्ये निश्चय असेल तर परिवार, मित्र, पुत्र, माझी सुरक्षा करतील असा विचार करणारा स्वतःच अनुभव करेल की असा विचार करणे धोक्याचे आहे. सुविधेसाठी कुटुंब आहे, समाज आहे. परंतु शेवटचे हे सत्य आहे की वस्तुत: 'मी एकटाच आहे.' जो असे चिंतन करतो तो कधीही फसविला जात नाही.
सत्य तीन प्रकारचे आहे १) प्रातिभासिक सत्य; २) व्यावहारीक सत्य ३) पारमार्थिक सत्य.१५५
प्रातिभासिक सत्य - सत्याचा केवळ ज्यात आभास होतो, वास्तविक जे असत्य असते ते प्रातिभासिक सत्य होय. जसे तुम्ही रेल्वेमध्ये बसलेले आहात, रेल्वे तीव्र गतीने चालत आहे आणि तुम्ही खिडकीच्या बाहेर पाहिले तर तुम्हाला झाडे, दिव्यांचे खांब इत्यादी पळताना दिसतील. त्याला सत्य मानावे लागते. कारण गाडीत तुमच्या शेजारी