________________
RISAR
ASHOG
(३६०)
तेव्हा देवेन्द्र म्हणाले - राजर्षी ! तुम्ही मिथिलेकडे पहा, मिथिला अग्नीमध्ये जळत आहे. आपले अंतःपुर - राणीवास सुद्धा जळत आहे. तुम्ही तिकडे का पाहत नाही ? राजर्षी म्हणाले -
सुहं वसामो जीवामो जेसिमो नत्यि किंचणं ।
मिहिलाए डज्झमाणीए न मे डज्झइ किंचण ॥१४॥१४२ हे ब्राह्मणा ! मी सुखाने जगत आहे, सुखाने राहत आहे. माझ्याजवळ स्वतःचे असे काहीच नाही. मिथिला जळत असली तरी तिच्या जळण्याने माझे काहीच जळत नाही.
अशाप्रकारे इंद्र आणि नमीराजर्षीचे बरेच संवाद प्रश्नोत्तररूपात आहेत. ह्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत - समत्व आणि एकत्व. नमीराजर्षी अत्यंत समभावाने इंद्राला उत्तर देत होते. यातून त्यांची आंतरिक आत्म्याचे विशुद्ध स्वरूप प्रकट करण्याची उत्कट भावना किती प्रबळ आहे त्याचे दर्शन होते.
त्यांनी महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की, मी तर सुखपूर्वक राहत आहे, जगत आहे, आत्मभावाच्या मस्तीत जगत आहे आणखीन काय पाहिजे ?
शांतसुधारसामध्ये समत्वभावाबरोबर एकत्वभावाची अनुभूती करण्यासाठी नमी राजर्षीचे उदाहरण दिले आहे ते अत्यंत योग्य आहे. नमी राजर्षीच्या चरणात इन्द्र भावपूर्वक वंदन करून स्तुती करतात.
इंद्राने प्रत्यक्ष प्रकट होऊन स्तुती केली तरी नमी राजर्षीना गर्व होत नाही. परंतु ते विशिष्टरूपाने आत्मभावनेमध्ये लीन होतात.
एकदा जर मनुष्याच्या भावनेमध्ये परिवर्तन झाले, समतापूर्वक एकत्वभाव समजून गेले तर परमानंद प्राप्त करण्यासाठी वेळ लागत नाही.
ग्रंथकाराने एकत्व भावनेचे विवेचन करताना गितीकेमध्ये सांगितले आहे, “हे आत्मन ! संसारात कोण कोणाचा आहे" अशी निर्मळ मती ज्याच्या हृदयामध्ये स्फुरीत होते त्याला पापजनित दुःख कोठून होणार ?"
किती स्पष्ट आहे की प्राणी एकटाच उत्पन्न होतो आणि एकटाच विपन्न होतो. एकटाच कर्मबद्ध होतो आणि एकटाच त्यातून मुक्त होतो.
वेगवेगळ्या ममत्वाच्या भाराने दबलेला प्राणी परिग्रहाचे ओझे वाढवितच जातो,