________________
MUNNY
(३६१)
अत्याधिक भार ठेवलेली नौका बुडून जाते त्याचप्रकारे तो संसाररूपी सागरात बुडून जातो. जीवनाची बाजी हरतो. तुम्हाला तर माहीतच आहे की सुवर्णासारखा मूल्यवान धातू जर एखाद्या हलक्या धातूमध्ये मिळाला तर तो आपली निर्मलता घालवून देतो. तो तर एकटाच चांगला वाटतो. त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा एकटाच शोभतो. परभवात पडलेला आत्मा आपल्याबरोबर अनेकप्रकारच्या संबंधाची जाळी पांघरतो. तोच आत्मा जर कर्ममळापासून मुक्त झाला तर शुद्ध सुवर्णाप्रमाणे चमकतो. अशाप्रकारे विचार केल्याने आत्म्यामध्ये शांत सुधारसाचा आविष्कार होईल त्याचा आस्वाद घेतल्याने सर्व इंद्रियजन्य भोगांपासून दूर अशा शांतसुधारसाचा आनंद प्राप्त होईल.
___ ह्या गेयाष्टकामध्ये उपाध्याय विनयविजयजींनी सुंदर चिंतन प्रस्तुत केले आहे, आत्म्याला प्रश्न विचारला आहे- ह्या विश्वात तुझे काय आहे ? हा दिव्य विचार ज्याच्या चित्तात निर्माण होतो त्याला पापाचा स्पर्शसुद्धा होऊ शकत नाही कारण तो समजून जातो की मी विशुद्ध आणि अविनाशी आत्मा आहे आणि ज्ञान इत्यादी माझे गुण आहेत. ह्यांशिवाय माझे काहीच नाही. चर्मचमूंनी दिसणारा एकसुद्धा पुद्गल अथवा पर्याय माझा नाही आणि जे माझे नाही ते सुधारो अथवा बिघडो त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. मी एकटाच आलो आहे आणि एकटाच जाईन. सर्वांच्यामध्ये राहून सर्वांहून वेगळे राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. एकत्व आणि समत्वाच्या भावनेने जो आत्मानंद प्राप्त होतो तो अलौकिक असतो. अनेकतेच्या गोंगाटातून मुक्त होऊन खूप दूरवर एकत्वाच्या क्षीरसागरामध्ये डुबकी लावण्याचा प्रयत्न केल्यानेच ज्ञात होईल की आत्म्याची मस्ती काय असते.
___ आत्म्यामध्ये डुबकी तोच घेऊ शकतो जो ममत्व भावनेपासून दूर राहतो. आसक्तीचे जहाज जड असेल तर मनुष्य संसार सागरामध्ये बुडून जातो. "मी एकटा आहे" असा विचार केल्याने ममत्वाचा भार हलका होतो आणि तो तरू लागतो. ज्याला पर द्रव्याची आसक्ती असते तो युवा असो अथवा वृद्ध तो पर वस्तूसाठी धडपडतो, ठोकर खातो, अधोगतीला जातो.
जैन रामायणातील एक घटना आहे - लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर श्री रामाची स्थिती अशी दयनीय झाली की ते पुन्हा पुन्हा मूर्च्छित होऊन जमिनीवर पडत होते. लक्ष्मणावर श्री रामाचा अतिशय जीव होता. ते हे मानण्यासाठी तयार नव्हते की, लक्ष्मणाचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मणाच्या मृतदेहाला आपल्या खांद्यावर घेऊन ते सहा महिन्यापर्यंत फिरत