________________
(३५९)
नाहीत तोपर्यंत व्यक्ती त्या वृक्षाच्या शीतल, सुगंधित हवेचा आनंद घेऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे हा आत्मा परद्रव्याने, परभावाने आवृत्त आहे. म्हणून आत्म्यात असलेल्या गुणांचा स्पर्श करू शकत नाही. ह्या परभावांना तोडून मनाला मुक्त करण्यास सांगितले आहे. ज्यायोगे आत्मविचाररूपी चंदन वृक्षाच्या थंड हवेचा स्पर्श करू शकेल.
उपाध्यायजी पुढे म्हणतात - हे आत्मन : समत्वभावनेबरोबर तू एकत्वभावनेचा अनुभव करूनच नमिराजर्षीप्रमाणे आनंदसंपदेला प्राप्त करू शकशील.१३९
एकत्व भावनेचे चिंतन करता करता परमानंद प्राप्त करायचा असेल तर एकत्वाबरोबर समत्वाला जोडावे लागेल. असे केल्याने हा शत्रू, हा मित्र असा भेद राहत नाही. हे कंचन, हे कथिर असा भेद राहत नाही. तो साधक नमिराजर्षीप्रमाणे परमानंदाच्या संपत्तीला प्राप्त करू शकतो. ह्या विषयात इंद्र आणि नमिराजर्षीचा संवाद वस्तूतः हृदयस्पर्शी आहे. जेव्हा ते मिथिला सोडून साधू बनण्यासाठी राज्यवैभव, भोग, सुखाचा त्याग करून जाऊ लागले तेव्हा मिथिलेमध्ये सर्वत्र विलाप, रुदन, शोक, गोंगाटाचे वातावरण पसरले. त्यावेळी देवराज इंद्राने आपल्या अवधिज्ञानाच्या आलोकात नमिराजर्षी याला मिथिला सोडून जाताना पाहिले. इंद्राने ब्राह्मणाचे रूप घेतले आणि नमिराजर्षांजवळ जावून नमस्कार करून विचारले -
किण्णु भो ! अज्ज मिहिलाए कोलाहलग - संकुला । ये सुवन्ति दारुणा सुददा, पासाएसु गिहेसु य ?॥१४०
हे राजर्षी ! आज मिथिलेमध्ये, राजवाड्यात, घरात सर्वत्र रूदन, विलाप इत्यादी शब्द का ऐकू येत आहे ? राजर्षी म्हणाले -
"मिहिलाए चेइए वच्छे सीयच्छाए मणोरमे । पत्त पुप्फ-फलोवेए बहुणं बहुगुणे सया ।। बाएण हीरमाणंमि चेइयंमि मणोरमे ।
दुहिया असरणा अत्ता एए कन्दन्ति भो ! खगा ॥१४१ हे ब्राह्मणा ! उद्यानामध्ये असलेला मनोहर वृक्ष प्रचंड तुफानाने तुटून पडतो, तेव्हा त्यावर बसलेले पक्षी दुःखी होतात, आश्रयरहित होतात म्हणून ते क्रंदन, रुदन करतात अर्थात लोक आपला स्वार्थ नष्ट झाल्याने रडतात, माझ्या प्रव्रज्येमुळे रडत नाहीत.
mmHE