________________
(३५८)
अक्षय अकलंक छे जीवनुं ज्ञान आनंद स्वरूप रे ||
शरीर, मन, वचनाने मुक्त, कर्माने मुक्त असणारी आत्मसत्ता हेच तुझे स्वरूप आहे असे चिंतन करायचे आहे.
" मी मन स्वरूप नाही, मन पौद्गलिक आहे, मी आत्मा आहे.
मी वचन स्वरूप नाही, वचन पौद्गलिक आहे, मी चैतन्य आहे. मी शरीर स्वरूप नाही, शरीर पौद्गलिक आहे, मी आत्मा आहे. मी आत्मा आहे, चैतन्य स्वरूपी आहे, कर्मापासून भिन्न आहे.
मी ज्ञानात्मा आहे, मी दर्शनात्मा आहे, मी स्वगुणभोगी आहे. "
अशाप्रकारे आत्म्याच्या एकत्वाचे चिंतन केल्याने मी एकटा आहे. माझे कोणी नाही अशी दीनता येणार नाही. परंतु आत्मविश्वास वाढेल, आत्मश्रद्धा निर्माण होईल. खऱ्या अर्थाने हीच आपली ओळख आहे.
पर वस्तूचा परिचय आत्म्याची ओळख करण्यात अडथळा असून घातक ठरतो. पर द्रव्याचा परिचय झाल्यावर त्याने सुख प्राप्त करण्याची अनादी काळाची वाईट सवय जागृत होते. ती सवय त्याला सोडावी लागेल. परस्त्रीबरोबर ममत्व करण्याचा परिणाम म्हणजे मनुष्याला आपल्या जीवनापासून हात धुवावे लागतात. परंतु पर द्रव्याच्या ममत्वाचा परिणाम तर त्याच्यापेक्षा अधिक भयंकर होतो. हजारो जन्मापर्यंत दुःखे भोगावी लागतात. म्हणून परभावाने आणि पर द्रव्याबरोबर कधीही ममत्व राखायचे नाही.
रामाच्या काळातल्या रावणापासून तर वर्तमानकाळातील रावणापर्यंत पाहा. परद्रव्याबरोबर ममत्व ठेवणाऱ्यांच्या भयंकर पीडेचा इतिहास असंख्य वर्षापासून आहे, त्याला वाचल्याने व शास्त्र वाचल्याने त्यांच्या भयंकरतेचे ज्ञान होईल. त्यायोगे ममत्व सोडण्याची प्रेरणा प्राप्त होईल.
उपाध्यायजी आपल्या मनाला संबोधून म्हणतात अरे, माझ्या मना ! परभवाच्या ह्या आवरणाला तोडून थोडा मुक्त हो. ज्यामुळे आत्मविचाररूपी चंदन वृक्षाची शीतल हवा तुला स्पर्श करू शकेल.
ह्या मनाला परभावाने आवृत्त सांगितले आहे आणि आत्मविचाराला शीतल चंदनाच्या वृक्षाचे उदाहरण दिले आहे. ह्यावरून उपाध्यायजींच्या सांगण्याचा हा अभिप्राय आहे की, ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षावर सर्प लटकलेले असतात, जोपर्यंत ते सर्प दूर होत