________________
(३५७)
उपाध्याय श्री विनयविजयजी यांनी एकत्व भावनेचे विशिष्ट स्पष्टकरण करताना सांगितले आहे हा आत्मा एकच आहे, हाच प्रभू आहे, भगवान आहे, ज्ञानदर्शनाच्या तरंगामध्ये मस्त आहे. ह्याशिवाय जे काही आहे ते सर्वकाही केवळ ममत्व आहे. केवळ कल्पनामात्र आहे. हे ममत्व व्याकुळतेला वाढविणारे आहे. १३७
ग्रंथकाराचा सांगण्याचा भावार्थ हा आहे की साधकाने सतत चिंतन केले पाहिजे की, मी आत्मा आहे. मी विशुद्ध आत्मद्रव्य आहे, आत्मसत्ता आहे, शुद्ध ज्ञान, दर्शन माझा गुण आहे. कल्पना जग हे वेगळे आहे. आत्म्याची मस्ती अन्य आहे. त्याचाच अनुभव घ्यायचा आहे. साधकाने आत्मध्यानात सदैव लीन राहीले पाहिजे आणि विचार केला पाहिजे की,
"आतम सर्व समान निधान महासुख कंद | सिद्ध तणा साधर्मि सत्ताए गुणवृन्द || "
विशुद्ध आत्मसत्तेच्या दृष्टीने सर्व आत्मे सारखेच आहेत, समग्र आत्मसृष्टी एकच आहे. जशी स्थिती सिद्ध परमात्म्याची आहे तशीच सर्व आत्म्यांची आहे. ह्या दृष्टीने विशुद्ध आत्मसत्तेच्या दृष्टीने आपण सिद्धचे साधर्मिक आहोत. सिद्धांप्रमाणे अनंत सुखमय, ज्ञानमय, गुणमय आहोत. सर्व आत्म्यांची सत्ता सुद्धा सारखीच आहे.
साधर्मिक म्हणजे असे लोक ज्यांचे गुणधर्म सारखे असतात. सिद्धांमध्ये ज्ञान, सुख, आनंद इत्यादी अनंत गुण आहेत ते आपल्यामध्ये सुद्धा आहेत.
आत्माच भगवान आहे, प्रभू आहे म्हणजे मी आत्मा आहे, भगवान आहे, सिद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, पूर्णानंदी आहे, पूर्ण ज्ञानी आहे, पूर्ण सुखी आहे. शुद्ध नयाने, अशा भावनेने सतत युक्त असते त्यामुळे पापाचा नाश होतो आणि आत्मस्वरूप प्रकट होते.
एकत्व भावनेमध्ये सर्व व्यक्ती आणि वस्तूंना आपले न मानता "माझा आत्मा आहे", "मी आत्मा आहे" आणि जेव्हा पर भाव सुटतो तेव्हा तर 'स्व' मध्ये आल्यानंतर आत्मा आपल्या स्वजनांना शोधतो. आत्म्याचे स्वजन त्याच्या गुणधर्माप्रमाणेच होऊ शकतात म्हणून सिद्धांचे जीव स्वजन आहे. अन्य कोणीही बरोबर राहणारे नाही.
उपाध्याय श्री यशोविजयजीच्या 'अमृतवेली' काव्याचे प्रसिद्ध पद आहे देह-मन वचन पुद्गल थकी कर्म थी भिन्न तुज रुपरे,