________________
(३५६)
आणि अपकार करण्यासाठी पापकर्मच बरोबर जातात आणि इहलोक अथवा परलोकामध्ये त्याचे फळ जीव एकटाच भोगतो. १३५
जर
ह्या गाथेमध्ये पंडित आशाधर यांनी अत्यंत सुंदर सांगितले आहे कोणीबरोबर परलोकात गेले असते तर लोक त्या दृष्टांताच्या आधारे हे सिद्ध करू शकले असते की जीवाबरोबर परलोकामध्येही कोणी स्नेही संबंधी जातात. परंतु असे कधी झाले नाही किंवा होणारही नाही.
-
ह्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे की इहलोक व परलोकात खूप अंतर आहे. परंतु वैभवाच्या काळात जीव ज्यांना स्वतःचे, आपले मानतो असे लोक विपत्ती अथवा दुःखाच्या काळात सहायक होत नाहीत. कर्मामुळे जर कोणी करोडपती, रोडपती झाला तर त्याच्या नातेवाईकांना हा माझा भाऊ आहे, हा माझा मामा आहे अथवा अन्यकाही नाते आहे हे सांगण्याची सुद्धा त्यांना लाज वाटते. ज्यांच्यासाठी जीवनभर कष्ट केले असे नातेवाईकसुद्धा दुःखात उपयोगी होत नाहीत म्हणून ग्रंथकार पुढे म्हणतात
-
जीव जे पुण्य अथवा पाप कर्म करतो ती परलोकात त्याच्याबरोबर जातात आणि त्याच्या फलस्वरूपी तेथेसुद्धा सुख आणि दुःख भोगतात. अन्य दुसरा कोणीच आत्म्याबरोबर जाणारा नाही.
ह्या शरीरामध्ये जन्मकाळापासूनच ममत्व आणि अहंकाराचे संस्कार दृढ झाले आहेत. जर हे शरीर मेल्यानंतर जीवाबरोबर एक पाऊलही पुढे जात नाही तर आत्मा आणि शरीर यापासून भिन्न दिसणारे स्त्री, सुवर्ण इत्यादी पदार्थांची काय कथा ? अर्थात व्यवहार नयरूप नेत्ररोगाद्वारे आरोपित माझा आत्मासुद्धा भेदरूपी आत्म्याचे दर्शन घडवितो. निश्चय नयाने तर मी एकटाच आहे. १३६
ह्यात ग्रंथकारांच्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की, जीवाचा अतिघनिष्ट संबंध शरीराबरोबर आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शरीराच्या बरोबरच संबंध राहतो, म्हणून हे शरीर माझे आहे असा ममत्वभाव तीव्र होतो. आणि मी राजा आहे, मी शेठ आहे, सावकार आहे हा अहंकारसुद्धा निर्माण होतो. हे भाव आत्म्याचे नाहीत. कर्माच्या उदयाने उत्पन्न झालेले ममत्व आणि अहंकार आत्म्यापासून भिन्न आहेत. मेल्यानंतर हे शरीर ज्याला पुष्ट करण्यासाठी, सजविण्यासाठी जीवन पूर्णपणे खर्ची करतो परंतु ते एक पाऊलसुद्धा पुढे जात नाही. तसेच स्त्री पुत्र, पैसा, परिवार इत्यादी प्रत्यक्षभिन्न असणाऱ्या गोष्टींची सुद्धा जीवावरोबर जाण्याची कल्पना करणे व्यर्थ आहे.