________________
(३५५)
नाही त्यामुळे सोडण्याची आवश्यकता सुद्धा नाही. तेव्हा मित्र पुन्हा म्हणाला, तो मुक्त आहे असे तू मानतो. परंतु तो तर स्वतःला बंदिस्तच समजत आहे आणि म्हणूनच इतर चोवीस उंटांप्रमाणे रात्रभर तो उभा सुद्धा राहीला. जोपर्यंत अन्य उंटांना तुम्ही जसे सोडले तशी सोडण्याची नक्कल त्याच्या बरोबर करीत नाही तोपर्यंत कितीही चाबूक मारले तरी त्या उंटाला पुढे चालविण्यात तुम्ही यशस्वी होणार नाही आणि खरोखर त्या उंटाला खुंट्यातून सोडविण्याचे केवळ नाटक केले आणि चाबकाने मारल्याशिवायच तो उंट पुढे चालू लागला.
१३४
मनुष्याची सुद्धा हीच स्थिती आहे. आपण स्वतःच स्वतःला बांधलेले असते आणि तेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा स्वतःच बंधनातून मुक्त होऊ शकतो. परंतु त्या दिशेने पुरुषार्थ करण्याची आवश्यकता आहे. सर्वकाही आपल्यावरच निर्भर आहे. परमगती प्राप्त करायची असली तरी सुद्धा आपण स्वतंत्र आहोत आणि सातव्या नरकात जायचे असले तरीही आपण स्वतंत्र्य आहोत. आपल्याला कोणी बळजोरीने बांधू शकत नाही आणि हाथ पकडून कोणी मुक्तीकडे सुद्धा नेऊ शकत नाही.
प्रत्येक जीव स्वतःस्वतः चे कर्मफल एकटाच भोगत असतो. म्हणून साधकाने समुहात राहून एकांततेचा अनुभव करण्यास शिकावे लागेल. एकत्व भावनेचे चिंतन करावे लागेल. निसंगपणे अर्थात संगरहित राहावे लागेल. संग केवळ पर वस्तूचाच होतो असे नव्हे तर 'स्व' वस्तूचा संगतर नेहमीच असतो. संयोग, वियोग पर वस्तूचा होतो. आत्म्याचा वीतराग भाव तर आत्म्याजवळ निरंतर आहेच. असे सतत चिंतन - अनुभावन करावे लागेल.
मुले जेव्हा शाळेत जाऊ लागतात तेव्हा त्यांना सर्वप्रथम एक अंक शिकवितात. त्याने सुद्धा एकत्वाची प्रेरणा प्राप्त होऊ शकते. ज्यांच्या मनात एकत्वाची भावना ठसते, त्याची प्रत्येक वस्तूमध्ये अनासक्त भावना निर्माण होते.
एकत्व भावनेचे जेव्हा चिंतन करायचे असेल तेव्हा सर्व प्रथम हे जीवा ! असा विचार कर की, तुझ्या पूर्वभवाचे कोणी पुत्र इत्यादी ह्या भवामध्ये तुझ्याबरोबर आले आहेत का ? जर आले असते तर अंदाजाने सांगितले असते की ह्या जन्मातील सुद्धा कोणी संबंधी मरून तुझ्याबरोबर जातील. म्हणून हे माझे आहे या मिथ्या अभिप्रायाला सोडून दे, आणि हे जीवा ! काय तू जिवंत असताना अनुभव घेतला आहेत की ज्यांना तू स्वतःचे मानतोस ते ऐश्वर्याच्या काळात तुझे जसे आत्मिय होतात तसे विपत्तीच्या काळातही सहायक झाले आहेत का ? परंतु जीवावर उपकार करण्यासाठी पुण्य कर्म