________________
केला की हे बंधन तर अनादिकाळापासून आहे, या बंधनातून मुक्त होण्याची शक्ती, ते बंधन तोडण्याची शक्ती आपल्यामध्ये कोठे असणार ? अशाप्रकारच्या दुर्बळ वृत्तीच्या माणसासमोर जरी स्वतः तीर्थंकर परमात्मा उपस्थित झाले तरी त्या बंधनातून त्याची सुटका होऊ शकत नाही.
दुसऱ्यांनी बांधलेल्या बंधनातून सुटणे कदाचित कठीण आहे. परंतु स्वतःनेच जी बंधने निर्माण केली आहेत त्यातून सुटका होऊ शकते. मनुष्याने उपाय केले तर क्षणात त्याची सुटका बंधनातून होऊ शकते.
हे एका उदाहरणाद्वारे समजू शकेल -
रणप्रदेशात पंचवीस उंट बरोबर घेऊन एक माणूस एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाला. रात्र होताच रानामध्ये विश्राम करण्यासाठी थांबला. आपल्या सामानांमधून उंटांना बांधण्यासाठी दोऱ्या काढू लागला. परंतु हैराण झाला. कारण उंट तर पंचवीस होते आणि दोऱ्या चोवीसच होत्या. आता काय करावे ? असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. त्याने त्याच्याबरोबर आलेल्या त्या क्षेत्राचा आणि कार्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला म्हटले की, हा रणप्रदेश आहे. आणि त्यातून ही रात्रीची वेळ, भयंकर तुफान, चोरांचे भय. उंट कदाचित पळूनही जातील अथवा चोरीला जातील अशी परिस्थिती आहे. आता काय करावे ? बरोबरच्या साथीदाराने सांगितले, घाबरण्यासारखे काहीच नाही, सर्व उंटांप्रमाणे ह्यालासुद्धा दोरीने बांधण्याचे केवळ नाटक कर, तो कोठेच जाणार नाही. दोरीची काहीही आवश्यकता नाही. बांधण्याच्या नाटकानेसुद्धा तो कोठेच जाणार नाही.
उंटाच्या मालकाला मात्र ही गोष्ट पटली नाही. परंतु सल्ला देणारा मोठा अनुभवी होता म्हणून त्याच्या सल्ल्याप्रमाणे काम करणे त्याने स्वीकारले. आणि तसेच केले. चोवीस उंटांना दोरीने बांधून टाकले आणि पंचविसाव्या उंटाला मात्र दोरीने बांधण्याचे केवळ नाटक केले आणि आश्चर्य तो उंट दोरी आणि खुंटीशिवाय अन्य बांधलेल्या उंटाबरोबर स्वतःसुद्धा बद्ध आहे ह्या भ्रमात रात्रभर उभा राहिला
सकाळ होताच त्याने चोवीस उंटांचे बंधन सोडले आणि त्यांना घेऊन पुढे चालू लागला. परंतु तो पंचवीसावा उंट मात्र तसाच उभा राहीला. चाबकाने मारून त्याने उंटाला पुढे चालविण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुद्धा एक पाऊलही पुढे चालला नाही. तेव्हा त्याने अनुभवी मित्राचा सल्ला घेतला.
त्या मित्राने सांगितले की तू त्याची दोरी सोडली का ? परंतु त्याला बांधलेलाच