________________
(३५२)
जेव्हा जीव विभ्रम सोडून आपल्या खऱ्या स्वरूपाला समजून घेतो की मी एकात्मक आहे तेव्हाच त्याचा जन्मसंबंध ह्या संसारातले आवागमन विशीर्ण होते.
शुभचंद्राचार्यांनी मोठ्या रहस्यमय गोष्टींचे उद्घाटन केले आहे. वास्तविक जेव्हा प्राण्यांमध्ये ही भावना उत्पन्न होते की, ज्यांना तो आपले समजतो ते सर्व सोडून जाणारे आहेत. तो स्वतःच स्वतःच्या बंध आणि मोक्षाचा स्रष्टा आहे, असे सर्व भाव जाणल्यानंतर जीव बंधावस्थेकडे का जाईल ? तो मुक्तत्वाकडे जाईल म्हणूनच आचार्यांनी भवभ्रमण विशीर्ण होण्याची घोषणा केली आहे. १२९
कल्पना करा की एक व्यक्ती आपल्या अशुभ कर्मांच्या परिणामांमुळे नरकात जाते. आपल्या भव प्रत्यय अवधिज्ञानाद्वारे जर त्याला अनुभव आला की, मी जी संपत्ती अत्यंत परिश्रमपूर्वक एकत्रित केली होती, तिचा उपभोग अन्यलोक घेत आहेत तर त्याला केवढा पश्चाताप होत असेल ? परंतु पाप करून धन उपार्जन करणारा नरकात आपल्या केलेल्या कर्माचे फळ एकटाच भोगत असतो. १३०
चैतन्यरूप एकत्वाचे ज्ञान दुर्लभ आहे परंतु तेच ज्ञान मोक्ष देणारे आहे. जर ते कशाही प्रकारे प्राप्त झाले तर त्याचे पुन्हा पुन्हा चिंतन केले पाहिजे. १३१
मनुष्य इतका मोहात फसला आहे की मी एकटा आहे असे ज्ञान होणे कठीण आहे आणि ज्याला नमी राजर्षीप्रमाणे एकदा ज्ञान होते तो संसाराच्या मोहमायेमध्ये पुन्हा गुरफटत नाही. नमी राजर्षीचे उदाहरण तिसऱ्या प्रकरणात उद्धृत केलेले आहे. ते उदाहरण ह्या भावनेच्या पुष्टीसाठी अत्यंत प्रेरणास्पद आहे. ह्या भावनेच्या चिंतनाने त्यांनी आत्मबोध प्राप्त केला.
ज्याप्रमाणे उत्कृष्ट नौका प्राप्त झाल्यावर स्थितप्रज्ञ साहसी पुरुष समुद्राच्या अपरिमित जलाने भयभीत होत नाही त्याचप्रमाणे एकत्वला जाणणारा योगी कठोर कर्मालासुद्धा घाबरत नाही. १३२
हे आज मानवाला धन, पुत्र, मित्र, परिवार यांची आवश्यकता वाटण्याचे कारण आहे की, तो विचार करतो की ते मला संकटाच्या वेळी उपयोगी पडतील. परंतु ज्यांनी एकत्व भावनेचे चिंतन केलेले आहे, संसाराबद्दलची विचित्रता, अशरणता आणि अनित्यता जाणली असेल तो कधीच एकटा राहण्यासाठी भीत नाही किंवा कर्म भोगण्याची त्याला भीती वाटत नाही. "आलिया भोगासी असावे सादर" समोर आलेल्या कर्माला भोगण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. तो खिन्नतेचा अनुभव करीत नाही.