________________
(३४८)
कोणी असे समजतात की, मी माझ्यासाठी दुसऱ्यांकडून धर्माराधना करवून घेतो, पुण्यार्जन करवून घेतो, त्याच्या फलस्वरूपी स्वर्गसुख प्राप्त करेन असा विचार करणे हा त्याचा अज्ञानीपणा आहे.
धर्म, पाप, पुण्य सर्व काही मनुष्य एकटाच आणि स्वतःच करतो आणि केलेल्या कर्माचे स्वतःच फळ भोगतो.
पुढे पात्र-अपात्र कोण ? याचे विवेचन करताना ग्रंथकाराने सम्यक्त्वाने युक्त मुनींना 'उत्तम पात्र' सांगितले आहे आणि सम्यक् दृष्टी श्रावकाला 'मध्यम पात्र' सांगितले आहे. अविरत सम्यकदृष्टीला 'जघन्य पात्र' सांगितले आहे. व जो सम्यक्त्वरहित आहे त्याला 'अपात्र' म्हणून सांगितले आहे.
___ इथे असा संकेत केला आहे की पात्र-अपात्राची चांगल्याप्रकारे परीक्षा केली पाहिजे. त्यांच्या सांगण्याचा आशय हा आहे की मानवाला पात्रता प्राप्त करण्याच्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे.
मिथ्यादृष्टी कुपात्र आहे. त्याला दान देणे योग्य मानले जात नाही. दान दिल्याने चतुर्विध संघात स्थिरता येते म्हणून दान देण्याची प्रवृत्ती मोक्ष मार्गाची प्रवृत्ती आहे. जर पात्र उत्तम असेल, देणाऱ्याची भक्ती श्रेष्ठ असेल आणि दान सुद्धा उत्तम असेल तर त्याचे फळही उत्तमच असते.
सर्व दानांमध्ये आहारदान प्रथम आणि मुख्य आहे. आहारदानाने सर्वांना सुख प्राप्त होते. आहार दानाने तिन्ही दान संपन्न झाले असे म्हटले जाते कारण आहाराच्या बळावर साधू दिवसभर शास्त्राध्ययन करतात. भूक, तहान यांचे रोग नष्ट करण्यासाठी आहार निमित्त तर आहेच परंतु आहराने प्राणांचे रक्षण होते म्हणून अभय देणारे आहे. अशाप्रकारे आहारदानामध्ये औषध, शास्त्र व अभय ही तिन्ही दाने गर्भित आहेत.
___ 'मी एकटाच आलो आणि एकटाच जाणार आहे. ह्या शरीर, संपत्ती, पत्नी, कुटुंब याबरोबर राहत असतानासुद्धा मी एकटाच आहे' असे ज्यांचे चिंतन असेल तोच दान देऊ शकतो आणि दानामुळे जो धर्म, पुण्य होईल तोच जीवाबरोबर जातो बाकी सर्वकाही इथेच राहते. जीवनाचे परमसाध्य प्राप्त करायचे असेल तर जीव वीतराग प्रभूद्वारा प्रतिपादित रत्नत्रयात्मक साधनेद्वारे आपल्या विषमकर्माचा क्षय करून टाकतो. वस्तुतः तो खऱ्या सुखाच्या मार्गावर चालणारा एकटाच आपल्या शुद्धात्म्याचा अनुभव करतो. कोणीही अन्य त्याला शुद्ध करू शकत नाही म्हणून संयमी साधकाने हे चिंतन केले पाहिजे की मी