________________
(३४२)
सतावू शकणार नाही. त्याला आत्मबळ प्राप्त होईल आणि त्याच्या हृदयात शुद्ध आत्म्याची अपूर्व ज्योत प्रकाशित होईल.
ज्याप्रमाणे जळत्या घरातून सारभूत वस्तू काढून घेतली तर जसे भविष्यात सुख मिळते तसेच जळत्या संसारातून आपल्या आत्मस्वरूपाला जाणून, आत्मज्ञान प्राप्त करून, उपाधीपासून जर दूर राहिलो तर विपत्तीपासून आपण वाचू शकतो. संसाराबद्दल उदासीनता आली तरीही ममत्त्वापासून मुक्ती मिळते.
"सुख की सहेली है अकेली उदासीनता
अध्यात्म की जननी है यही उदासीनता "
संसारातील विचित्रता पाहून हृदय वैराग्यमय होते. ह्या वैराग्याच्या शीतल पाण्याने वृत्ती उपशांत होतात. जगाच्या मोहाची आणि क्लेशपूर्ण परिणामांची धारा मंद पडते. जगातील कोणत्याही वस्तूसाठी मनामध्ये आवड उरत नाही. उदासीनता येते. गुजरातीमध्ये म्हटले आहे,
"उदासीनतानो ज्या वास, सकल दुःखनो छे त्या नाश"
अर्थात जेथे उदासीनता असते तेथे सर्व दुःखांचा नाश होतो. संसारामध्ये सुखदुःख, संयोग-वियोग, लाभ-तोटा, जय-पराजय, संपत्ती - विपत्ती इ. प्रसंगामुळे व्याकुळता, हर्ष, शोक निर्माण होतात आणि त्यामुळे अस्थिरता प्राप्त होते. अस्थिरता कमी होऊन स्थिरता प्राप्त होईल अशा पुरुषार्थामध्ये उदासीनतेच्या क्रमाचे सेवन आहे. ह्या क्रमामध्ये सफलतेपूर्वक पुढे जाण्यासाठी सत्पुरुषांच्या चरित्राचे सुद्धा स्मरण, चिंतन करणे हितकारी आहे.
प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये साता - असातावेदनीय कर्माचा उदय होत राहतो. तीव्र सातावेदनीयच्या उदयाने सांसारीक सुखाचे साधन सुलभतेने प्राप्त होते. अशावेळी समभाव प्राप्त होणे कठीण असते, तर गर्व, मद, प्रतिष्टेचा मोह, तृष्णा, अवगणना, तिरस्कार इ. दोषांचे आगमनाची संभावना होते. त्या दोषांपासून परावृत्त होण्यासाठी सत्पुरुषांच्या चरित्राचा आश्रय घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसे करीत असताना जर अहंकारादी दोष निर्माण झाले तर तीर्थंकरांच्या बाह्य ऋद्धी-सिद्धी, वैभवादींचे स्मरण करून विचार करता की सर्वप्रकारची उत्तम शक्ती असतानाही ते अलिप्त राहत होते, गर्वापासून दूर होते. अशाप्रकारच्या चिंतनाने आत्मार्थी जीव बोध घेऊन उदासीन भावनेमुळे समभावात राहू शकतात. अशाप्रकारे साता वेदनीयाच्या उदयाने आत्मस्थिरता आणि आत्मशांती प्राप्त