________________
(३४१)
................
..
-.-3.00A
a
दर केला पाहिजे. आत्म्याशिवाय कोणत्याही वस्तूवर ममत्व ठेवणे, म्हणजेच संसार होय, परिभ्रमण होय असे चिंतन केल्याने राग, आसक्ती नष्ट होईल.
“विगतो रागो यस्मात् विरागः तस्य भावः वैराग्य ।" अर्थात ज्याच्यातून राग निघून गेला तो विराग आणि त्याचा भाव 'वैराग्य' आहे. वैराग्यभावामध्ये जो रममाण होतो तो 'स्व' वस्तूला ओळखण्याचा आणि पर वस्तूच्या संबंधाला हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतो. ती 'स्व' वस्तू कोणती आहे आणि परवस्तू कोणती आहे हे त्याला समजणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे.
संसार भावनेमध्ये 'पर'चे वास्तविक स्वरूप, त्याचा जीवाबरोबरचा संबंध किती कसा? कोठपर्यंत आणि तो कोणत्या कारणास्तव उत्पन्न होतो, ह्याचा विचार केला. संसार भावनेच्या आधारे चिंतन केल्यावर वैराग्यभावना दृढ होते. ह्या जगाची वास्तविकता काय आहे ह्याचा विचार केल्याने हे स्पष्ट होते की ह्या जगात सर्व प्राणी सारखे नाहीत. प्रत्येकाची बुद्धिमत्ता, वैभव आणि क्षमता वेगवेगळी आहे. ज्याच्याजवळ 'पर' पदार्थाची विपुलता आहे तो अहंकाराने फुलतो आणि ज्याच्याजवळ काही नाही त्याच्यामध्ये हीनभावना उत्पन्न होते. ह्या दुविधामय संसारी जीवाच्या आजाराची चिकित्सा ही 'संसारभावना' आहे. पाच प्रकारच्या संसार परिवर्तनाला जाणणाऱ्याला हे कळून चुकते की एका जन्मात जर मनुष्य अनेक स्थितींचा अनुभव घेत असेल तर अनेक जन्मात त्याला कितीतरी अनुभव येत असतील ? जी, व्यक्ती ह्या संसार भावनेच्या संसरणशीलतेला जाणते तिला गर्व होत नाही किंवा हीन भावनासुद्धा राहत नाही. जर संसाराच्या ह्या भीषणतेला समजून सुद्धा ज्याला भय वाटत नसेल तर त्याला मोठे साहसी म्हटले पाहिजे. समोर शत्रूला पाहून सुद्धा त्याची उपेक्षा करणाऱ्याला काय म्हणावे ? चतुर्गतींचे दुःख ऐकले, अनुभव घेतला. परंतु आजही ज्ञानदृष्टीसमोर ते प्रस्तुत आहे तरीही त्याला नष्ट करण्याचा जर मनुष्याने प्रयत्न केला नाही तर मनुष्याचे शहाणपण व्यर्थ आहे.
जो सहृदयतेने ह्या संसार भावनेचे चिंतन करतो त्याच्या जीवनात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो. जीवनाला सन्मार्ग दाखविणाऱ्या आणि कर्तव्यबोध करविणाऱ्या ह्या संसार भावनेला हृदयंगम केल्याने साधकासमोर संसाराचे शुद्ध स्वरूप स्वयमेव प्रकट होते. त्यामुळे संसारी जीवाची स्थिती कशी होते त्याचा साक्षात्कार होतो. चतुर्गतीच्या दुःखाचे वर्णन एकदा तरी मनामध्ये कंपन उत्पन्न करते. ह्या अनुपम भावनेला जो हृदयात स्थान देईल आणि सर्वज्ञाच्या वचनावर श्रद्धा ठेवेल त्याला संसारातील बिकट आणि विषम भाव
tionLANISMustindiawunludinvisandaariduWIDGARIKAARAvisiladisanidindiansaninibalationalistillenniumMIRLIAsiadiadalkarnavinatanicurminadiasiriilianitarindi
a
hivanistr
S