________________
(३४३)
करण्यासाठी सत्पुरुषांचे चरित्र आधारभूत आहेत.
जेव्हा असातावेदनीयाच्या तीव्र उदयाने शारीरिक, मानसिक वेदना, वियोग, स्वजनांचे मरण इत्यादी प्रसंग उद्भवतात तेव्हा अत्यंत दु:खामुळे चित्ताची स्थिरता राहणे अथवा दुःख सहन करणे अत्यंत कठीण होते. अशावेळी धैर्य, समता, क्षमा आणि सहिष्णुता यांचा आश्रय घेऊन चिंतन करावे की तेविसावे, तीर्थंकर श्री पार्श्वनाथ प्रभू, चार ज्ञानाचे धारक, अनेक सिद्धींचे स्वामी, आत्मस्वभावाची पूर्णता प्रकट करण्याचे इच्छुक होते. त्यांनासुद्धा पूर्व जन्माचा वैरी कमठचा जीव देवगतीमध्ये होता तिथे त्याला पूर्व जन्माच्या वैराची आठवण होताच अनेक प्रकारचे मारणांतिक उपसर्ग देऊ लागला.
तरीही प्रभूंना समभावामध्ये स्थिर पाहून शेवटी भयानक वीजेच्या कडकडाटाबरोबर मुसळधार पाण्याचा वर्षाव केला. पाण्याची पातळी वर वर चढत गेली आणि पार्श्वप्रभूंच्या खांद्यापर्यंत पोहचली तरीसुद्धा प्रभू स्थिर राहिले. त्यांना भीती वाटली नाही की द्वेष किंवा क्रोधही आला नाही. दुसरा कोणताच भाव त्यांच्यामनामध्ये नव्हता. त्यांच्या आत्म्यामध्ये केवळ हेच भाव होते की, सर्वांपासून सर्वप्रकारे मी भिन्न आहे. एकमात्र शुद्ध चैतन्य स्वरूप, परमोत्कृष्ट, अचिंत्य, सुखस्वरूप, शुद्ध अनुभवरूप 'मी' आहे. मी केवळ निर्विकल्प शुद्ध परमशांत चैतन्य आहे. निजस्वरूपात तन्मय होत आहे.
अशा चिंतनात तल्लिन असतानाच धरणेन्द्रदेवाचे आसन डोलायमान झाले. आणि उपयोग लावून पाहिले तर पूर्वभवाचे रक्षणकर्ते सन्मार्ग दर्शक परम उपकारी पार्श्वप्रभूंना उपसर्ग होत आहे. हे पाहून अविलंबगतीने अंशतः उपकाराचा मोबदला चुकविण्याच्या हेतूने, उपसर्ग दूर करण्यासाठी विराटकाय सर्पाच्या वलयाचे आसन करून, सप्तफणांची छत्री बनवून प्रभूंचे रक्षण केले. पाणी जसजसे वर चढत होते तसतसे आसनसुद्धा उंच जात होते. कमठचा जीव थकून गेला. इतक्यात पार्श्वनाथ प्रभूंना केवलज्ञान प्राप्त झाले. आणि सर्वत्र शांती झाली.
अशा घोर मारणांतिक उपसर्गामध्येही प्रभू कसे निर्विकार आत्मदर्शी होते ! त्यावेळी प्रभूंना उपसर्ग करणाऱ्याबद्दल द्वेष वाटत नव्हता किंवा रक्षण करणाऱ्याबद्दल प्रेम वाटत नव्हते ते केवळ समभावात स्थिर होते. समाधीमध्ये तल्लिन होते. आणि शुद्धोपयोगी सुधारस धारेत निमग्न होते.
अशाप्रकारे पार्श्वनाथ भगवानांचे स्मरण अवश्य केले पाहिजे. असे अनेक दृष्टांत आहेत. चोविसावे तीर्थंकर भगवान महावीरांना संगमदेवाने सहा-सहा महिन्यांपर्यंत उपसर्ग