________________
(३३०)
नाहीत म्हणून त्यांना 'कर्मकृत' म्हणतात. अज्ञानी जीव आत्म्याला कर्मजनित भावाने यक्त मानतात ही मान्यताच संसाराचे बीज आहे अर्थात कर्मजनित भावाला स्वतःचे मानणे अनंत संसाराचे कारण आहे.९२
श्री जिनभद्रगणि क्षमाश्रमण यांनी राग, द्वेष आणि मोहाला संसाराचे कारण सांगितले आहे आणि आर्तध्यानामध्ये ह्या तीनही गोष्टी आहेत म्हणून आर्तध्यानाला संसारवृक्षाचे 'बीज' म्हटलेले आहे.९३
स्वामी कार्तिकेय यांनी मिथ्यात्व आणि कषायाने युक्त अशा जीवांचे जे अनेक शरीरामध्ये संसरण अथवा भ्रमण होते त्याला 'संसार' म्हटले आहे.
___ अशा संसारामध्ये चार गती आहेत आणि अनेक प्रकारची दुःखे आहेत. प्रथम नारकीय जीवाच्या दुःखाचे वर्णन करताना लिहिले आहे की हा जीव पापाच्या उदयाने नरकामध्ये उत्पन्न होतो, तेथे जीवाला पाच प्रकारचे दुःख अर्थात असुरकुमार देवांद्वारे उत्पन्न केलेले, शरीराने उत्पन्न झालेले, क्षेत्रीय आणि परस्पर केलेले अशी दुःखे भोगावी
लागतात.९४
असुरकुमार देव तिसऱ्या नरकापर्यंत जाऊन नारकीयांना परस्पर भांडण करायला लावतात हे त्यांच्यासाठी केवळ कुतुहल असले तरी त्यामुळे नारकीय जीव अत्यंत दु:खी होतात.
पापाच्या उदयामुळे नारकांचे शरीर अनेक रोगाने युक्त, घृणास्पद आणि दुःखमय असते.
चित्तसुद्धा महाक्रूर आणि दुःखी असते.
नरकाचे क्षेत्र महाशीत, उष्ण, दुर्गंधी आणि उपद्रवसहित असते. परस्पर वैराच्या संस्काराने छेदन, भेदन, मारण ताडण इत्यादी करतात. तेथील दुःख इतके भयंकर आहे की त्याचे वर्णन कोणत्याही उपमेद्वारा केले जात नाही.
नरकाचे दुःख वाणीद्वारे अवर्णनीय आहे. असे दुःख कित्येक सागरोपमकाळापर्यंत सहन करावी लागतात. आयुष्य पूर्ण झाल्याशिवाय तेथून सुटकादेखील होऊ शकत नाही.
__नरकातून निघून अनेक प्रकारच्या तिर्यंच गतीमध्ये हा जीव उत्पन्न होतो. तेथे गर्भात राहण्याचे दुःख आणि छेदन इत्यादी दुःखे भोगतात. परस्पर खाण्याचे, मनुष्यांद्वारे भारले जाण्याची दुःखे सहन करावी लागतात. जिच्या गर्भात उत्पन्न होतो अशी मातासुद्धा