________________
(३२९)
करण्याचा उद्यम करेल. हे प्रसिद्धच आहे की गौतम बुद्ध संसाराच्या दुःखाला आणि खाच्या कारणांना जाणून संन्यासी झाले. परंतु पुष्कळ लोक मोह, मदिरेने दुःखालासुद्धा सखरूप मानून राग, द्वेष करता करता संसार चक्रामध्ये परिभ्रमण करत राहतात.
कर्माच्या विपाकाने अभिभूत आत्म्याला भवांतराची प्राप्ती होणे म्हणजे 'संसार'
होय.९०
आचार्य अकलंकदेव लिहितात की द्रव्यादींच्या निमित्ताने आत्म्याला पर्यायान्तराची जी प्राप्ती होते त्याला संसार म्हणतात. आत्म्याच्या चार अवस्था होतात.
१) संसार - अनेक योनी असलेल्या चार गतींमध्ये परिभ्रमण करणे म्हणजे संसार आहे.
२) असंसार - जन्म न घेणे, शिवपद प्राप्ती अथवा परम सुख प्रतिष्ठा म्हणजे असंसार आहे.
३) नो संसार - चतुर्गती परिभ्रमणही नाही आणि मोक्षप्राप्तीसुद्धा नाही अशी सयोगी केवलीची जीवनमुक्त अवस्था म्हणजे 'ईषत्संसार' किंवा 'नो संसार' आहे.
१) अ नो संसार - उपरोक्त तिन्ही अवस्थेपेक्षा विलक्षण अवस्था अयोगी केवलीची आहे. अयोगी केवलीला चतुर्गती भ्रमण किंवा असंसाराची प्राप्ती नाही. आणि केवलीप्रमाणे शरीरस्पंदनही नाही. जोपर्यंत शरीर स्पंदन नसतानासुद्धा आत्मप्रदेशाचे चलन होत राहते तोपर्यंत संसार आहे.९१
हा आत्मा कर्माद्वारे केलेल्या रागादी अथवा शरीरादी भावात असंयुक्त असतानाही अज्ञानी जीवाला संयुक्तासारखा प्रतिभासित होतो आणि हा प्रतिभासच संसार आहे.
आचार्य अमृतचंद्राचे असे सांगणे आहे की रागादी भावामुळे पुद्गल कर्म आहे. हा आत्मा तर स्वशुद्ध भावाच्या अपेक्षेने कर्मजनित विविध प्रकारच्या भावाने वेगळा असला तरी मात्र चैतन्यमय पदार्थ आहे. राग इ. भाव आत्म्याचा स्वभाव नाही. आत्मा तर निर्मळ चैतन्य गुणामध्येच स्थित आहे. अज्ञानी पुरुषांना वास्तविक आत्मा राग इत्यादी रूपातच प्रतिभासित होतो. ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाला भूताने झपाटले तर तो भूताच्या प्रभावाने विविध प्रकारच्या विपरीत क्रिया करतो. त्या क्रियेचा कर्ता तर तो मनुष्यच आहे परंतु त्या क्रिया त्याचा निजस्वभाव नाहीत म्हणून त्यांना 'भूतकृत' असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे हा जीव कर्माच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या रागादी भावात परिणमन करतो. त्या रागादी भावांचा कर्ता वास्तविक जीवच आहे परंतु ते त्या जीवाचे निजभाब