________________
(२३)
संस्कृतीमध्ये ह्याला एक उच्चस्थान प्राप्त झालेले आहे. कर्मांची शुद्धी इत्यादींना रामायणामध्ये आचरणाची प्रमुख अंगे मानलेले आहे.
या ग्रंथात अयोध्यापती दशरथांचा पुत्र, रामाला चरित्रनायक मानून वाल्मिकींनी जीवनाच्या विविध भागांवर सुंदर प्रकाश टाकला आहे. तो आज सुद्धा जनतेसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. रामाला मर्यादा पुरुषोत्तमाच्या रूपात चित्रित केलेले आहे. एका अत्यंत न्यायप्रिय राजाच्या रूपात त्याचे चित्रण केलेले आहे. म्हणूनच महात्मा गांधींनी जेव्हा अहिंसेने स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली तेव्हा त्यांनी 'रामराज्य' आणण्याची कल्पना केलेली होती. त्यांचे लक्ष्य असे होते की भारतात न्यायनीतियुक्त, सुखशांतिदायक, नैतिक नियमांवर आधारित असे राज्य असावे जसे रामाचे होते.
महाभारत हे भारतीय साहित्यातील एक अद्भूत संस्कृत महाकाव्य आहे. ह्याच्यात जवळजवळ लाखांपेक्षा अधिक श्लोक आहेत. ह्या महाकाव्याचा नायक अर्जुन आहे. ह्याची रचना महर्षी वेदव्यास त्यांनी केलेली आहे. त्यांनी मोठ्या गर्वाने सांगितले आहे की,
'जे या ग्रंथात आहे ते सर्वत्र (धार्मिक साहित्यात) आहे. जे यात नाही ते कुठेही नाही. '
पुढे त्यांनी लिहिले आहे की, 'यद् भारते, तद् भारते, यद् न भारते, तद् न
भारते'
म्हणजे जे महाभारतात आहे तेच ह्या भारतवर्षात आहे आणि जे महाभारतात नाही ते भारतवर्षात सुद्धा नाही. ह्याचे तात्पर्य असे की महाभारतात ते सर्व काही आहे जे भारतीय साहित्यात आहे. व्यासांची ही दंभोक्ती नाही. महाभारत वास्तविक हिंदू धर्माचा विश्वकोश आहे.
पुराण - पुराणांमध्ये हिंदू धर्माच्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक इत्यादी सर्व सिद्धांतांचा समावेश आहे. सामान्यतः वायुपुराणाला सर्व पुराणात प्राचीन मानले जाते.
वायुपुराण, विष्णुपुराण, अग्निपुराण, मत्स्यपुराण, ब्रह्मपुराण, नारदपुराण, शिवपुराण, कर्मपुराण, भागवतपुराण, गरुडपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, इत्यादी विशाल पुराण साहित्य आहे. यात वैदिक पारंपरिक जीवनावर प्रकाश टाकला आहे.