________________
(२२)
राहत होते म्हणून या ग्रंथाला 'आरण्यक' असे नाव पडले.
उपनिषद उपनिषदाला 'वेदांत' सुद्धा म्हणतात. कारण हे वेदांचे अंतिम भाग मानले जातात. त्यांची संख्या एकशे आठ मानली जाते. त्यातील ईशावास्योपनिषद्, केनोपनिषद्, कठोपनिषद्, प्रश्नोपनिषद्, मुण्डकोपनिषद्, माण्डूक्योपनिषद्, ऐतरेयोपनिषद्, तैत्तिरीयोपनिषद्, वेताश्वतरोपनिषद्, कौषितकी, महानारायण, बृहदारण्यक, छांदोग्य इत्यादी अनेक मुख्य उपनिषदे मानली जातात. उपनिपदाने ज्ञानकांडाला विशेष महत्त्व दिले आहे. सांसारिक सुख-सुविधांपेक्षा उपनिषद् काळातील लोकांनी मोक्षावर अधिक भर दिला आहे. त्याच्यात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, तप, दान, आत्मसंयम, दया, शांती इत्यादी अनेक मुक्तिमूलक विषयांचे वर्णन केलेले आहे. सूत्र - सूत्राचे चार विभाग आहेत.
(१) श्रौतसूत्र (२) गृह्यसूत्र (३) धर्मसूत्र (४) शुल्वसूत्र
-
स्मृती - स्मृतींची रचना अनेक ऋषिमहर्षीनी केलेली आहे. स्मृतींमध्ये सामाजिक रीतीरिवाज, व्यवस्था, नियम, उपनियम वर्णिलेले आहेत. विवाहसंस्कार, संपत्तीचे विभाजन, अधिकार, लोकांचे कर्तव्य इत्यादींवर ह्याच्यात विवेचन केलेले आहे.
ह्याच्यात मनुस्मृती, याज्ञवल्क्य, पाराशरस्मृती इत्यादी मुख्य आहेत. याज्ञवल्क्य स्मृतीवर एक प्रसिद्ध टीका आहे. त्याचे नाव 'मिताक्षरा' आहे. त्यात उपरोक्त विषयाचे स्पष्ट विश्लेषण आहे.
'हिंदू लॉ च्या निर्मितीत स्मृतींची खूप मदत झाली आहे. जेव्हा भारतात 'ईस्ट इंडिया कंपनी' चे शासन होते तेव्हा भारताची राजधानी 'कलकत्ता' होती. 'सर विलियम जोन्स' नावाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. यांनी 'हिंदू लॉ' तयार करताना विशेषत्वाने संस्कृतचा अभ्यास केला. स्मृतिग्रंथांचा आणि अन्य साहित्याचा त्यांनी गाढा अभ्यास केला. त्यामुळे 'हिंदू लॉ' ची निर्मिती झाली.
मनुस्मृती ही वैदिक धर्मातील ब्राह्मण परंपरेचे मार्गदर्शन करते. राधा कुमुद मुखर्जीच्या मते तैत्तिरीय आणि मैत्रायणी संहितेत तसेच छांदोग्योपनिषदात मनुचा उल्लेख नियम निर्धारित करणाऱ्याच्या रूपात केलेला आहे. ५
रामायण महर्षी वाल्मिकींनी रचलेले असल्याने हे महाकाव्य 'वाल्मिकी रामायण' या नावाने प्रसिद्ध आहे. हे संस्कृत साहित्यातील एक अत्यंत प्रसिद्ध महाकाव्य आहे. ह्याला लौकिक साहित्याचे 'आदि काव्य' मानलेले आहे. ब्राह्मण धर्म आणि