________________
(२१)
७. ब्राह्मण संस्कृती आणि साहित्य ब्राह्मण संस्कृतीचा आधार वेद आहे. वेद शब्द संस्कृतमधील 'विद्' धातूपासून बनला आहे. जो 'ज्ञान' या अर्थाचा द्योतक आहे. वेद उत्कृष्ट ज्ञानाचे प्रतीक आहेत. वैदिक परंपरेचा श्री गणेश वेदानेच होतो.
१) ऋग्वेद २) सामवेद ३) यजुर्वेद ४) अथर्ववेद यांच्या रूपात वेद चार आहेत. अथर्ववेद परवर्ती कालीन मानला जातो. म्हणून वेदत्रयीच्या रूपात वेदांना अत्याधिक प्रमाणित मानले जाते. हिंदूधर्माच्या मान्यतेनुसार वेद सर्व संसाराच्या रचनेमध्ये सर्वात प्राचीन आहे. वेदांची भाषा संस्कृत आहे. संस्कृतची दोन रूपे आहेत. (१) वैदिक संस्कृत (२) लौकिक संस्कृत.
लौकिक संस्कृत वैदिक संस्कृताचे विकसित रूप आहे. वेदात सूर्य, अग्नी, मरुत, वरुण, पृथ्वी इत्यादींना देवतेच्या रूपात रवीकारले आहे. त्यांची स्तुती करण्यासाठी सूक्तांची रचना करण्यात आली आहे. वेद 'श्रुत' या नावाने प्रसिद्ध आहेत. विद्वान ब्राह्मण आपल्या मुलांना लहानपणापासूनच वेद कंठस्थ करायला लावत होते. वेदांची रचना स्वर/धान आहे. उच्चारणाच्या उच्च, मध्यम आणि मंद आधारावर उदात्त, अनुदात्त व स्वरित हे तीन स्वर मानले आहेत. वेद स्वरबद्ध असल्याने स्मरणात ठेवणे सोपे आहे. दक्षिण भारतात आजसुद्धा ब्राह्मण कुटुंबात वेदाच्या अध्ययनाची परंपरा कायम आहे.
UTTAR
संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद् डे वेदांचे चार उपविभाग आहेत. तसेच सूत्र, स्मृती, रामायण, महाभारत, गीता, पुराण, इत्यादी वैदिक परंपरेचे प्रमुख ग्रंथ आहेत.
संहिता - वेदातील ऋचा आणि मंत्राना संहिता म्हटले जाते.
ब्राह्मण ज्या ग्रंथात वेदवर्णित यज्ञाच्या विधिविधानाचे विवेचन आहे त्यांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. वेदांतील यज्ञपरक मंत्र समजण्यासाठी ब्राह्मणग्रंथांची रचना झाली. त्यांच्या आधाराशिवाय वेदांचा अर्थ समजणे कठीण आहे. हा वेदाचा कर्मकांड नावाचा विभाग आहे.
आरण्यक - आरण्यक ते ग्रंथ आहेत जे वानप्रस्थांसाठी रचले आहेत. वानप्रस्थासंबंधी धर्माचरण आणि साधनेच्या नियमांचे त्यात वर्णन आहे. आरण्यक शब्द 'अरण्य' यानं बनला आहे. 'अरण्य' मनाचा वाचक आहे. वानप्रस्थाश्रमी अरण्यात