________________
(२०)
चौथा आरा पूर्ण झाल्यावर तीन क्रोडानुक्रोडि सागरोपमाचा सुषमा नावाचा पाचवा आरा सुरू होतो. तो अवसर्पिणी काळाच्या दुसऱ्या आयप्रमाणेच असतो. फरक इतकाच की उत्सर्पिणी काळात वर्ण इत्यादी शुभ पर्यायांची वृद्धी होत जाते. त्यानंतर चार क्रोडाक्रोडि सागरोपमाचा सुषम- सुषमा नावाचा सहावा आरा सुरू होतो. तो अवसर्पिणी काळाच्या प्रथम आयप्रमाणे असतो.
अशाप्रकारे दहा क्रोडाक्रोडि सागरोपमाचा उत्सर्पिणी काळ पूर्ण झाल्यावर पुन्हा अवसर्पिणी काळ येतो. असा वीस क्रोडाक्रोडि सागरापमीच एक काळचक्र भरतक्षेत्र आणि ऐरावत क्षेत्रात अनादी काळापासून फिरत आहे आणि अनंत काळापर्यंत फिरत राहील.
काळचक्राचे हे निरूपण साधकाच्या ज्ञानवृद्धीसाठी तर आहेच परंतु 'मी ह्या त्याच्याबरोबर मानवाच्या अंतःकरणात ही भावना उत्पन्न करतो की काळचक्रात अनंतकाळापासून विविध योनींत परिभ्रमण करत आहे. आता मला अशी साधना केली पाहिजे की ज्याच्यायोगे भवभ्रमणातून माझी कायमची मुक्तता होईल
६. भारतीय संस्कृतीच्या दोन धारा
-
भारतीय संस्कृतीच्या प्रमुख दोन धारा आहेत.
(१) ब्राह्मण संस्कृती
(२) श्रमण संस्कृती
आर्य संस्कृतीमध्ये मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी ह्या दोन प्राचीन परंपरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ह्या दोन्ही संस्कृतीचे उगमस्थान भारतातच आहे. ह्या पवित्र भूमीवर दोन्ही संस्कृती विकसित होत राहिल्या आहेत. त्या समकालीन असल्याने एका संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीवर प्रभाव पडणे स्वाभाविकच आहे.
भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे, हे भारत शब्दानेच स्पष्ट होते. भा-प्रकाश, रत-दत्तचित्त अर्थात प्रकाशाच्या मार्गात दत्तचित्त होऊन अनुष्ठान केल्याने जे संस्कार मानवाच्या मनावर घडतात, ती भारतीय संस्कृती होय. भारतीय संस्कृतीचा उपासक संसारातील इतर कार्य जरी करत असला तरी त्याची दृष्टी आत्म्यावर केंद्रीत असते. तो कमळाप्रमाणे चिखलात जरी उत्पन्न झालेला असला तरी त्या चिखलाने कधीही लिप्त होत नाही.