________________
(२४)
वैदिक काळात मनुष्य जीवन चार भागात विभागलेले होते. त्यालाच 'आश्रम'
ioe
d
Slipindihindifie
अशी संज्ञा आहे.
(१) ब्रह्मचर्याश्रम (२) गृहस्थाश्रम (३) वानप्रस्थाश्रम (४) संन्यासाश्रम.
मानव समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चार भागात विभागलेला होता. वर्ण अथवा जाती जन्मावर आधारलेल्या होत्या. उपनिषद् काळापूर्वी वैदिक धर्मात ब्राह्मणांचे प्रभुत्व स्पष्ट रूपात जाणवत होते.
८. श्रमण संस्कृती वैदिक संस्कृतीप्रमाणे श्रमण संस्कृतीच्या रूपात एका प्रमुख संस्कृतीचा विकास आणि विस्तार झाला. ज्याच्यात बौद्ध आणि जैन धर्माचा समावेश आहे. ही संस्कृती समतामूलक असल्याने हिला श्रमण संस्कृती म्हणतात. श्रमण शब्दाचा मूळ प्राकृत शब्द 'समण' आहे, त्याची तीन संस्कृत रूपांतरे होतात.
समन, श्रमण आणि शमन. समन - हा शब्द समतेचे प्रतीक आहे.
श्रमण - ह्या शब्दाचा अर्थ पुरुषार्थ, उद्यम, पराक्रम, परिश्रम अथवा मेहनत असा आहे.
शमन - हा शब्द 'वैराग्य' अथवा 'निर्वेद' यांचा द्योतक आहे.
जो सर्व जीवांना स्वतःप्रमाणेच समजतो, ज्याची भावना 'आत्मवत् सर्वभूतेषु' अशी असते, तो श्रमण होय. श्रमण संस्कृती तपप्रधान असल्याने श्रममूलक आहे. तेथे सांसारिक भोगाला महत्त्व नाही. तो समतेवर आधारित आहे. तेथे जाती, वर्ण, वर्ग व लिंग इत्यादी भेदाला कोणतेही स्थान नाही.
श्रमण भगवान महावीरांनी सांगितले आहे की, "जन्माने कोणीच उच्च-नीच होत नाही तर कर्माने होतो." मनुष्य समभावाने श्रमण होतो, ब्रह्मचर्य पाळल्याने ब्राह्मण होतो, ज्ञान प्राप्त केल्याने मुक्त होतो, आणि तप केल्याने तापस होतो.६
जो चांगले कर्म करतो तो उत्तम आणि जो नीच कर्म करतो तो अधम अशी ही जैन संस्कृती आहे.
महात्मा बुद्धांनीसुद्धा असे सांगितले आहे की, "जो व्रतयुक्त आहे, सत्यभाषी
initiusmsinni
Bindaba