________________
(३२५)
ली
हानीस्थानाच्या दृष्टीने जीवाचे आठ भेद केले आहेत. अंडज, पोतज, जरायुज, रसज,
टज समर्छिम, उद्भिज आणि औपपातिक. ह्या सर्व त्रस प्राण्यांच्या समन्वित क्षेत्राला 'संसार' म्हणतात.८५
- मंद अर्थात विवेक बुद्धीची अल्पता आणि अज्ञान ही दोन संसार परिभ्रमणाची मुख्य कारणे आहेत.
१) अंडज - अंड्याद्वारे उत्पन्न होणारे मोर, कबूतर, हंस इ.
२) पोतज - पोत म्हणजे चर्ममय पिशवी. पोतद्वारा उत्पन्न होणारे पोतज. उदा. हत्ती, वल्गुली इ.
३) जरायुज - जरायु म्हणजे गर्भवेष्टन किंवा ती जाळी जी जन्माच्यावेळी शिशूला आवृत्त केलेली असते. जरायुबरोबर उत्पन्न होणारे जीव म्हणजे गाय, म्हैस इ.
४) रसज - दही, ताक इ. विकृत झाल्यावर ज्या कृमी उत्पन्न होतात त्यांना रसज म्हणतात.
५) संस्वेदज - धामापासून उत्पन्न होणारे ऊवा, लिखा इ.
६) समुर्छिम - बाह्य वातावरणाच्या संयोगाने उत्पन्न होणारे जीव. उदाहरणतः माशी, डास, भुंगा, भोवरे इ.
७) उद्भिज - जमीन फोडून निघणारे जीव. पतंग, तीड इ.
८) औपपातिक - 'उपपात' याचा शाब्दिक अर्थ 'सहज घडणारी घटना' असा आहे. आगमाच्या दृष्टीने पुष्पशय्येत आणि नारक कुंभीमध्ये उत्पन्न होतात. त्यांना एका मुहूर्तामध्ये (४८ मिनिटात) पूर्ण यौवनत्व प्राप्त होते. म्हणून यांना 'औपपातिक' म्हणतात.
ह्या आठ प्रकारच्या जीवाचे प्रथम तीन गर्भज, चार ते सात पर्यंत 'समुर्छिम' आणि आठवा 'औपपातिक' अशा तीन भेदामध्येसुद्धा समावेश होतो.८६
'बस' आणि 'स्थावर' या दोन भेदांमध्येच जीवाचा समावेश होतो. ह्या आठ योनी जीवाच्या जन्म-मरण, गमनागमन यांचे केंद्र आहे म्हणून ह्याला संसार म्हणतात.
संसाराला 'महासागराची' उपमा दिली आहे. समुद्रामध्ये पाणी असते तर संसाररूपी समुद्रात दुःखरूपी पाणी असते. जशी पाण्याची सीमा नाही त्याचप्रमाणे ससाराच्या दुःखाची सुद्धा सीमा नाही. समुद्रामध्ये पाताळ असतात. त्यात प्रवेश केल्यावर बाहेर निघणे सुद्धा अत्यंत कठीण आहे. समुद्रामध्ये भोवरे असतात तर संसारात द्रव्य,
SARAMESSISTANTS