________________
(३२४)
दुसरा अनुयोग - कोणत्या भावाने संसार होतो ? औदयिक, औपशयिक भायोपशमिक, परिणामिक इत्यादी भावाने संसार होतो.
तिसर अनुयोग - संसार कोणाला होता ? जे जीव ज्ञानावरण, दर्शनावरण वेदनीय, मोहनीय, आयुष्य, नाम, गोत्र आणि अंतराय ह्या आठ प्रकारच्या कर्माने युक्त आहेत, अशा संसारी जीवांना संसार होतो.
चौथा अनुयोग - संसार कोठे आहे ? मिथ्यात्व, अव्रत (असंयम), कषाय आणि योग जेथे आहे तेथे संसार आहे.
पाचवा अनुयोग - संसार किती काळ आहे ? अभवी जीवासाठी संसार अनादी अनंत आहे अर्थात अनादी काळापासून आहे. ह्याचा कधीच अंत नाही आणि भवी जीवासाठी अनादी, सांत आहे. अर्थात अनादि काळापासून आहे. परंतु ह्याचा अंत कधी तरी होईल.
सहावा अनुयोग - ह्या संसाराचे किती प्रकार आहेत ? सामान्य संसरणाच्या अपेक्षेने एक प्रकारचा आहे. आणि दोन पासून सहा पर्यंत अथवा अनेक प्रकारचा सुद्धा आहे.
ह्या अनुयोगाद्वारे सर्व पदार्थांना जाणले पाहिजे. ज्यामध्ये विविध प्रकारची दुःखे भरलेली आहेत. अशा अनेक प्रकारच्या संसाराची वास्तविकता समजन हा निःसार आहे असे चिंतन केले पाहिजे.८३
साधकाला असार संसारातून जागृत करण्यासाठी मूलाचारामध्ये अत्यंत विस्तारपूर्वक संसारानुप्रेक्षेचे विवेचन केले आहे. जन्म, जरा, मृत्यू, इष्ट वियोग, अनिष्ट संयोग यांनी भरलेल्या संसाराच्या स्वरूपाचे चिंतन केले पाहिजे. त्यामुळे आत्मा पथ भ्रष्ट होऊ नये ही सतत जागृती राहते..
तत्त्वार्थसूत्रामध्ये जीवाचे भेद सांगताना लिहिले आहे -
'संसारिणो मुक्तश्च' जीव 'संसारी' आणि 'मुक्त' अशा दोन प्रकारचा आहे.८४ कर्मयुक्त जीवांना 'संसारी' आणि कर्मरहित जीवांना 'मुक्त' म्हणतात. कर्मयुक्त जीवाचे जधन्य दोन, मध्यम चौदा, उत्कृष्ट पाचशेत्रेसष्ठ भेद होतात. याचे वेगवेगळ्या दृष्टीने विभाजन केलेले आहे.
आचारांग सूत्रामध्ये चतुर्गतीरूपी संसाराच्या स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. ह्यात