________________
(३२६)
क्षेत्र, काळ, भाव परिवर्तन असे चार भोवरे आहेत. समुद्रामध्ये द्विप असते तेथे काही काळ थांबू शकतो, संसारामध्ये चतुर्गतीच द्विपाचे कार्य करतात. अशा प्रकारे समुद्रसुद्धा अनंत आहे आणि संसार सुद्धा अनंत आहे.
संसाररूपी समुद्रामध्ये हिंसा, असत्य, चोरी, अब्रह्म आणि परिग्रहरूपी मगर इत्यादी क्रूर जंतू राहतात. स्थावर आणि जंगमरूपी मत्स्य अनेक आहेत. 'जाती' अर्थात नवे शरीर धारण करणे. 'जरा' म्हणजे वर्तमान शरीराचे तेज, बळ इत्यादींमध्ये क्षीणता 'येणे. 'मरण' अर्थात शरीर सोडणे. हे जाती, जरा आणि मरण ह्या संसारसागराची भरती आहे आणि शेकडो जातीरूपी तरंग आहेत. ज्याप्रमाणे एकेंद्रिय जाती ह्याचे पृथ्वीकाय इत्यादी पाच भेद यानंतर पृथ्वीकायाचे भेद अशाप्रकारे पंचेंद्रियांपर्यंत भेद-प्रभेदाच्या रूपात शेकडो जाती होतात. कर्मरूपी द्रव्याच्या भाराने भरलेले जीवरूपी जहाज शुभाशुभ वायूंनी युक्त अतीभयंकर संसार महासागरात प्रवेश करून दीर्घकाळापर्यंत परिभ्रमण करते.
द्रव्य, क्षेत्र, काळ, भव आणि भाव ह्या पाच प्रकारच्या संसाराचे संक्षिप्त वर्णन पूर्वी केले आहे. भगवती आराधनाकारांनी केलेले विस्तृत विवेचन इथे प्रस्तुत केले जात
आहे
द्रव्य परिवर्तन घटीयंत्र ज्याप्रमाणे पाणी ग्रहण करते, त्याला काढून पुन्हा नवे पाणी ग्रहण करते त्याचप्रमाणे जीव शरीर ग्रहण करतो आणि त्याचा त्याग करतो. अशाप्रकारे भ्रमण करीत राहतो. 'द्रव्य' शब्दाने येथे विविध शरीराला घेतले आहे. आत्म्याच्या शरीराचे परिवर्तन 'द्रव्य संसार' आहे. सामान्य साधकाला समजविण्यासाठी द्रव्य संसाराचे स्वरूप दाखविले आहे. परंतु भगवती आराधनेचे टिकाकार लिहितात की द्रव्य परिवर्तन वास्तविक खालीलप्रमाणे घ्यावयास हवे.
द्रव्य परिवर्तनाचे दोन भेद आहेत. 'नो' कर्म परिवर्तन आणि कर्म परिवर्तन. नो कर्म परिवर्तन औदारीक तेजस आणि आणि कार्मण अथवा वैक्रिय तेजस आणि कार्मण त्याचप्रमाणे सहा पर्याप्तांचे योग्य पुद्गल एका जीवाने एकाच वेळी ग्रहण केले. त्यात जसे स्पर्श, गंध, बर्ण असतात. दुसऱ्या क्षणात त्याला भोगून सोडून दिले अथवा निर्जरीत केले. पुन्हा नंतर अनंतवेळा गृहित- अगृहित आणि मिश्र पुद्गल ग्रहण करता करता तेच पुद्गल त्याच जीवाला त्याचप्रकारे जेव्हा नोकर्म रूपाला प्राप्त होतात त्या सर्वांना नोकर्म परिवर्तन म्हणतात.
कर्म द्रव्य परिवर्तन एका वेळेत एका जीवाने आठ कर्म रूपात जे
पुद्गल