________________
(३१९)
डॉक्टरांच्या संपूर्ण आज्ञेचे पालन करणे आवश्यक होते. तर भवरोग मिटविण्यासाठी सुदेव, आणि सुधर्माच्या आज्ञेचे पालन केल्याशिवाय, आपले जीवन त्यात समर्पित सुगुरू केल्याशिवाय भवभ्रमणापासून मुक्ती प्राप्त होणे अशक्य आहे. जो अरिहंत, सिद्ध, साधू आणि धर्माला शरण जातो तो स्वच्छंद होऊ शकत नाही. त्याने सतत ध्यानधारणा केली पाहिजे. मी ह्या चारांची शरण घेतली आहे. ह्या चारांशिवाय दुसरा कोणीही मला शाश्वत सुख देण्यास समर्थ नाही. कोणतेही संकट आले तर मनात एकच विश्वास ठेवला पाहिजे की ह्या सर्व संकटांना दूर करण्याची शक्ती ह्या चारांमध्येच आहे. असा समर्पण भाव असेल तरच भवपार होऊ शकेल. समर्पणाशिवाय नदी देखील पार करू शकत नाही. तर भवसागराची गोष्ट तर खूप लांबच राहिली. याचे एक सुंदर उदाहरण दिलेले आहे
एक माणूस पोहायला शिकण्यासाठी पाण्यात उतरला. तो बुडू लागला. त्याता कोण्या एका दुसऱ्या व्यक्तीने बाहेर काढले आणि सांगितले उद्या परत ये. हळूहळू पोहावयास शिकशील. तो म्हणाला, "आता मी तेव्हाच येईन जेव्हा मला पोहता येईल. जोपर्यंत पोहता येत नाही तोपर्यंत मी तलावाजवळ सुद्धा येणार नाही." आश्चर्यच आहे. पोहणे शिकायचे आहे आणि तलावाजवळ यायचे नाही. तर तो मनुष्य पोहण्यास कसे बरे शिकणार ?
बहुतांश लोक असेच म्हणतात की जोपर्यंत ध्यान करता येत नाही तोपर्यंत ध्यानच करणार नाही. अरे ! पाण्यात डुबकी मारल्याशिवाय जसे पोहणे अथवा तरणे शिकू शकत नाही त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये डुबकी घेतल्याशिवाय आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होऊ शकणार नाही. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे."
अशरण भावना ही चिंतन मननाची धारा आहे. यात डुबकी घेतल्याने, अवगाहन केल्याने व्यक्ती पराधिनतेपासून मुक्त होऊ शकते. जेव्हा व्यक्ती आपल्या स्वरूपाला समजू आणि बघू लागतो तेव्हा तिच्या लक्षात येते की विश्वामध्ये स्थित असलेले अनंतज्ञान, आणि, दर्शन, सुख आणि शक्ती या भाव, प्राण यांनी युक्त आहेत. सर्व स्वतः मध्ये स्वतंत्र आहे. आपल्या शक्तीचा विकास अथवा पतन ते स्वतःच करतात. कोणी तीर्थंकर अथवा सर्व शक्तिसंपन्न ईश्वरही कोणाच्या जीवनाचे परिवर्तन करू शकत नाही. म्हणून सर्वांनी स्वतःच स्वतःच्या शक्तीला जाणून, स्वतःच 'परभावापासून दूर होऊन किंवा पराधीनतेच्या भावनेतून मुक्त होऊन स्वतःमध्ये स्थिर झाले पाहिजे, स्वतःला शरण आ पाहिजे. तेव्हाच तो स्वतःचा संरक्षक होतो, स्वतःचे रक्षण करू शकतो आणि आपल्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त करू शकतो.