________________
(३२०)
अशरण भावना व्यक्तीच्या मनात अशी चेतना जागृत करते की सर्व दुःखाचे मूळ कारण परतंत्रता आहे, पराश्रय आहे. जोपर्यंत मन, वचन आणि शरीराचा संयोग आहे तोपर्यंत आपण 'पर' पासून सर्वथा मुक्त होऊ शकत नाही. पराश्रयाने मुक्त होण्याचा अर्थ इतकाच आहे की आपण 'पर' वस्तूलाच सर्वस्व मानून त्यावरच निर्भर राहू नये आणि त्याच्यावर ममत्व किंवा आसक्ती ठेवू नये. असे समजू नये की 'पर' पदार्थानेच माझे रक्षण होऊ शकेल. जो 'पर' पदार्थ किंवा परिजनांना आश्रयरूप मानून स्वतःला दुसऱ्यांच्या हाती सोपवून टाकतो तो आसक्त होऊन 'स्व'ला विसरून जातो. हीच अज्ञानता आहे आणि हेच दुःखाचे आणि जन्ममृत्यूचे मुख्य कारण आहे.
आज जगातील प्रत्येक व्यक्तीला नाथ बनण्याची इच्छा आहे. नेता बनण्याची तीव्र उत्कंठा होत आहे, आज मानव दुसऱ्यावर शासन करू इच्छितो. तो स्वतःचा नाही परंतु दुसऱ्याचा नाथ किंवा स्वामी बनण्याचे स्वप्न पाहतो. परंतु हे कसे शक्य होईल ? जो 'पर' प्रवाहामध्ये प्रवाहमान आहे, जो स्वरूपाने भिन्न पुद्गलांचा, भौतिक सुखांचा गुलाम आहे तो दुसऱ्याचा स्वामी, नाथ, नेता कसा होऊ शकेल ? हे कधीच संभ शकत नाही की स्वतः विषय, वासना, विकार आणि तृष्णेने त्याचप्रमाणे त्याने उत्पन्न होणाऱ्या जन्मृत्यूच्या दुःखातून आणि भयापासून वाचविण्यास असमर्थ व्यक्ती दुसऱ्याला त्या दुःखातून वाचवू शकेल. स्वतः मृत्यूच्या भयाने भयभीत अन्य कोणालाही निर्भय बनवू शकत नाही.
जे साधक मृत्यूच्या भयातून मुक्त झाले आहेत, ज्यांनी विकारावर आणि आकांक्षेवर विजय मिळवला आहे, जे मन, इंद्रिय आणि क्षणिक सुखाचे गुलाम नाहीत, परंतु स्वामी झाले आहेत, ते निर्द्वन्द्व, निर्विकारी आणि निर्भय साधक दुसऱ्यांना निर्भय करण्यात सहायक होऊ शकतात.
म्हणून आगमामध्ये श्रमण भगवान महावीरांपासून आगमोत्तर काळात आणि आजपर्यंतचे विचारक संत म्हणतात की तुम्ही स्वतः स्वतःचे स्वामी बना, नेता बना, नाथ व्हा. परंतु 'पर'चे नाही. जो परक्याचा नाथ होण्याची इच्छा ठेवतो किंवा स्वतःला दुसऱ्याचा नाथ होण्यासाठी योग्य समजतो तो स्वतःच अनाथ आहे. हे आपण अनाथी मुनींच्या दृष्टांतामध्ये पाहिले.
दुःखी ते लोक होतात जे दुसऱ्यांचे दास आहेत, सेवक आहेत परतंत्र आहेत. दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर स्वतंत्र होऊन चिंतन करा की संसारामध्ये कोणताच