________________
(३१८)
ल्याकडून मोठ्या राजाला शरण जातो. तो समर्थ राजा शरण आलेल्या राजाला सहायक मन संकटातून त्याला वाचवितो. पैशाच्या अभावामुळे गरीब व्यक्ती कोण्या दात्याच्या पाणी जाते. तो दाता त्याला आश्रय देऊन त्याचे कष्ट दूर करतो. अशाप्रकारे जगामध्ये लहान लहान दुःखातून वाचविणारे आणि आश्रय देणारे मिळतात.
प्रश्न असा पडतो की जेव्हा आश्रयाने जीवन चालते, एक दुसऱ्याच्या आधाराशिवाय जीवन चालणे कठीण आहे तर आपल्याला अशरण कसे मानावे ? ह्याचे समाधान असे आहे की हे सर्व शरण क्षणिक आहेत. ते क्षणभरच आश्रय देऊ शकतात आणि त्याने समाज, कुटुंब यांचा संबंध टिकून राहतो. ह्यांना अशरण मानून त्यांचा संबंध तोडण्याची गोष्ट इथे सांगितली नाही. इथे तर सर्व लेखकांचे आणि आत्मार्थी लोकांचे, ज्यांनी स्वतः अनुभव घेतला आहे अशा लोकांचे असे कथन आहे की जर शाश्वत शरण पाहिजे असेल तर शाश्वत वस्तूच्या शरण जावे. आणि ती शाश्वत वस्तू म्हणजे आपला आत्मा आहे. आपल्या आत्म्याला शरण जावे. अन्य कोणालाही शरण जाण्याची आवश्यकता नाही. जेव्हा संसारातील कोणतेही पदार्थ सहायक ठरत नाहीत, मृत्यू आपला जबडा उघडून समोर उभा ठाकतो त्यावेळेस उपरोक्त माता, पिता, डॉक्टर इत्यादी कोणीही शरणरूप होत नाहीत. म्हणून जे सत्य आहे, शाश्वत आहे त्यांचीच शरण घेणे, त्यांचेच चिंतन करणे म्हणजे अशरण भावना आहे.
___ संसार इतका विचित्र आहे की आज जे शरण देण्यास समर्थ आहेत ते सुद्धा स्वार्थवश तोंड फिरवताना दिसतात. सुखात सर्वजण साथ देतात, दुःखात मात्र कोणी कोणाचा सहायक होत नाही. अशावेळी मनुष्य दुःखी होतो. तो आत्महत्येचा सुद्धा विचार करतो. परंतु ज्यांनी अशरण भावनेचे नेहमी चिंतन केलेले असेल तो कधीही दुःखी होत नाही. कारण तो समजतो की हे सर्व संयोग क्षणिक आहेत आणि जे क्षणिक आहे ते शरणरूप कसे होऊ शकतील ? म्हणून शाश्वत आत्म्याचे चिंतन अनुभावन करणे अत्यंत आवश्यक आहे.
जो साधक साधनेला शरण जातो त्याला त्राण अथवा शरण प्राप्त होते. साधनेच्या शरणी जाणे काही सरळ आणि सोपे नाही. त्यात संपूर्ण समर्पण भाव असला पाहिजे. जसे एखादा रोगी डॉक्टरांना समर्पित होत नाही, डॉक्टरांच्या आज्ञेचे पालन करीत नाही आणि स्वच्छंदपणे खात असेल तर त्याने डॉक्टरांची शरण घेतली आहे असे म्हणता येईल का ? तो आजारातून मुक्त होऊ शकेल का ? आजारातून मुक्त होण्यासाठी सुद्धा
लगातार