________________
(३१२)
त संपत्तीने कुबेरापेक्षाही अधिक धनवान होते. महान ऋद्धी सिद्धी होती, विशाल सामने यूक्त जगामध्ये प्रसिद्ध होते. तरी त्यावेळी यौवनाच्या प्रारंभीच अनाथीमुनीला मोर नेत्रवेदना झाली आणि शरीराची आग होऊ लागली अर्थात शरीरामध्ये जणू तीक्ष्ण का भ्रमण करीत आहेत. किंवा वज्रमाराप्रमाणे अत्यंत भयंकर नेत्रवेदनेमुळे ते परवश
ले अनेक मंत्र, तंत्र, विद्या आणि चिकित्साशास्त्राच्या तज्ञ लोकांनी चिकित्सा केली परंतु त्यांना आराम मिळाला नाही. त्यांच्या वडिलांनी सर्वस्व लुटवणे स्वीकार केले. आई, भाऊ, बहीण, स्त्री, मित्र इत्यादी सर्व स्वजनसमूह भोजन, पाणी, विलेपण, आभूषण इत्यादी प्रवत्ती सोडून दुःखी मनाने अश्रू ढाळत कर्तव्यशून्य होऊन त्याच्याजवळ बसून राहिले. परंतु थोडीदेखील चक्षुवेदना कमी होऊ शकली नाही.
तेव्हा गुणसुंदर विचार करू लागला, "अहो ! मला कोणीच शरणरूप नाही." पुन्हा पुन्हा असे चिंतन करून त्यांनी प्रतिज्ञा केली की जर मी वेदनेतून मुक्त झालो तर सर्व स्वजनांना सोडून साधूधर्म स्वीकारीन. अशी प्रतिज्ञा केल्यानंतर त्यांना रात्री शांत झोप लागली, बेदना शांत झाली आणि ते स्वस्थ झाले. त्यानंतर सूर्योदय होताच त्यांनी स्वजनांची आज्ञा घेऊन सर्वज्ञ कथित संयमाची सम्यक चारित्र्याची शरण स्वीकारली. ही गोष्ट अनाथीमनी श्रेणिक महाराजांना सांगताना समजावतात की, 'हे नर श्रेष्ठा । अशा दुःखसमुहाने गुरफटलेल्या जीवाला श्री जिनेश्वर प्रभुंच्या धर्माशिवाय अन्य कोणी रक्षण किंवा शरण नाही. म्हणून मी भर यौवनावस्थेत संयम घेतले.'
अनाथीमुनी आणि श्रेणिकमहाराजांचा वार्तालाप तिसऱ्या प्रकरणात घेतलेला आहे. या दृष्टांताने हे स्पष्ट होते की भयंकर व्याधीमध्ये जिनेश्वरांच्या चरणांची शरणच आधारभूत होते. धन, वैभव, आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण, नातेवाईक हे कोणीच शरण होऊ शकत नाही.
हे संसाररूपी वन रक्षकविहिन आहे. त्यात उदयकाळरूपी पराक्रमाने संयुक्त अशा कर्मरूपी व्याघ्राने ग्रहण केलेला हा मनुष्यरूपी पशू, “ही माझी प्रिया आहे, हा पुत्र माझा आहे, हे द्रव्य माझे आहे आणि हे घर सुद्धा माझे आहे' अशाप्रकारे 'माझे-माझे' करत मृत्यूला प्राप्त होतो.६८
ज्याप्रमाणे वनामध्ये सुगंध प्राप्त होताच चित्ता किंवा अस्वलाद्वारे पकडल्या गेलेल्या बकरी इत्यादी पशुंचे रक्षण करणारा तेथे कोणीच नाही. तो मैं, मैं शब्द करून मरण पावतो त्याचप्रमाणे ह्या संसारामध्ये कर्माधीन प्राण्यांची सुद्धा मृत्यूपासून रक्षा करणारे