________________
असले तरी मृत्युमुखातून वाचविण्यासाठी कोणीच समर्थ नाही. दुसऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर मर्ख मनुष्य स्वकर्माने मृत्यूकडे जाणाऱ्या स्वजनांना, कुटुंबातील लोकांना यमाद्वारे नेताना पाहून शोक करतात. परंतु ते हा विचार करीत नाही की एक दिवस आपल्याला सुद्धा अशाप्रकारे नेले जाईल.६४
हेमचंद्राचार्य इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात की जेव्हा दुसऱ्यांना मरताना पाहिले जाते तेव्हा ही गोष्ट स्पष्ट आहे की त्यांचे मृत्यूपासून रक्षण करणारा कोणीच नाही. तेव्हा त्याच्या मनातही आले पाहिजे की त्याच्याबरोबरही असेच घडेल. परंतु ही गोष्ट त्याच्या लक्षात येतच नाही. हीच तर दुर्बलता आहे. या दुर्बलतेकडे मनुष्याचे ध्यान आकर्षित करून आपल्या खऱ्या स्वरूपाला पाहण्याची प्रेरणा दिली आहे. पुढे आचार्य लिहितात की एखाद्या भयानक वनात मृगशावकावर सिंहाने आक्रमण केले तर त्याला कोण वाचवू शकतो ? त्याचप्रमाणे दुःखरूपी दावाग्नीच्या जळत्या ज्वालेत दग्ध होणाऱ्या संसारात पडलेल्या मनुष्याला कोणीच त्राण देऊ शकत नाही.६५
दुःख दावानाल, जळत्या ज्वाला अशा शब्दांचा प्रयोग करून आचार्यांनी मनुष्यांच्या समोर संसाराचे असे भयंकर चित्र अंकीत केले आहे की ज्यामुळे मानव वास्तविकतेला समजू शकेल आणि अनुभवू शकेल की तो स्वतःला जितका सुरक्षित आणि सशरण मानतो ती त्याची भ्रांती आहे.
हे जीवांनो ! तुमच्याजवळ जेव्हा धनाचा विपुल संग्रह असतो तेव्हा सर्व लोक मनात विचार करतात की हे आपल्याला सहयोग करतील. परंतु तुमच्यासमोर जेव्हा ते येऊन उभे राहतात तेव्हा कोणी काहीच देत नाही. जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा समुद्रात जहाजातून च्यूत झालेल्या प्राण्याला कोणी शरणरूप नाही त्याचप्रमाणे मृत्यूपासून वाचविण्यासाठी त्याला कोणी शरणरूप होत नाही.६६
सर्व जीवसमुहाचे रक्षण करण्यात वत्सल, महान आणि करुणारसाने परिपूर्ण जिन वचन आहे. एका श्री जिन वचनाशिवाय अन्य मंगलाने, मंत्रपूर्वक स्नान केल्याने मंत्रित चूर्णाने मंत्राद्वारे आणि वैद्यांच्या विविध औषधींनीसुद्धा रक्षण होत नाही. अशाप्रकारे संसारात कोणतीच वस्तू शरणरूप नाही.६७ म्हणूनच दुःसह नेत्रवेदनेने व्याकूळ शरीर असणाऱ्या, पूर्वी दिव्य यौवनाला प्राप्त करणारे, बुद्धिमान, कौशाम्बीच्या धनिक पुत्राने सर्व स्नेही संबंधाचा त्याग करून संयमाचा स्वीकार केला. याचे वर्णन उत्तराध्ययन सूत्राच्या विसाव्या अध्ययनामध्ये केलेले आहे. गुणसुंदर जे पुढे मुनी झाले, ते अनाथीमुनींचे पिता कौशाम्बी