________________
(३१०)
जर मरणाऱ्या मनुष्याला देव, मंत्र, तंत्र, क्षेत्रपाल इत्यादी वाचवू शकले असते मनष्य अमर झाला असता. या संसारात मंत्र, तंत्र, तोटके इत्यादी करणाऱ्यांना आपण पाहतोच.६१ परंतु ही सर्व साधने वास्तविक पाहता निरर्थक सिद्ध होतात. प्राण्याला वाचविण्यासाठी हे शरणरूप नाहीत. परंतु मिथ्यात्वाच्या अंधकाराने व्याप्त जीव हे समजू शकत नाही. आता पाचवा दुःखम आरा चालू आहे. या विषमकाळात प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या दुःखाने, कष्टाने, त्रासाने विघ्नबाधेने गुरफटलेला आहे. ह्यातून सुटण्यासाठी पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या मृगतृष्णेप्रमाणे व्यक्ती भटकत राहते. कधी मिथ्यादृष्टी देवीदेवांच्या शरणी जाते आणि नवसाच्या भ्रमात भ्रांत होऊन त्यांच्याभोवती फिरत राहते. कधी पीर-फकीर यांच्या कब्रेवर, तर कधी मुल्लाच्या हातकंड्यात, कधी लोभी, लालची, दंभी भविष्य वक्त्यांच्या तावडीत फसते, तर कधी हकीम, वैद्य, डॉक्टरांच्या चक्रामध्ये हरलेल्या जुगाऱ्याप्रमाणे असा फसते की त्यातून सुटूही शकत नाही उलट समस्या अधिकच वाढत जाते.
___ अर्धज्ञानी, लोभी, स्वार्थी व्यक्ती ज्यांचे दर्शन व ज्ञान मिथ्या आहे अशा अनंतानुबंधी कषाययुक्त मिथ्यादृष्टी देवी-देवता काही कारणास्तव रुष्ट झाले तर आपल्या भक्ताचा सर्वनाश करण्यासाठी तयार होतात. असे झाल्याने धर्मश्रद्धा भ्रष्ट होते. यामुळे व्यक्ती भ्रमित होते. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपली सद्गती इच्छिणाऱ्या महानुभावांनी सर्व मिथ्यादृष्टी मानव अथवा देवीदेवता यांची कधीच शरण घेऊ नये. परंतु ह्यांपासून नेहमी वाचण्यासाठी सतत जागृत राहिले पाहिजे.
सम्यगदृष्टी ज्यांना आहे त्यांच्यावरच श्रद्धा ठेवली पाहिजे. अशा व्यक्ती विवेकी असतात, खरा मार्ग दाखवितात, ते सर्वांच्या कल्याणाची भावना ठेवतात म्हणून अशा लोकांची शरण ग्रहण केल्याने आपले भले होते.६२
___ जो अन्य वस्तूला शरण न मानता, भोगेच्छारूपी निदान बंध इत्यादीपासून अलिप्त स्वात्मज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या सुखरूपी अमृताचा धारक असणाऱ्या स्वतःच्या शुद्धात्म्याचा अवलंब करून त्याचीच भावना करतो. जसे आत्म्याला शरणरूप मानून भावित होतो तसेच सर्वकाळात शरणभूत आणि शरण आलेल्यांसाठी वजाच्या पिंजऱ्याप्रमाणे स्वशुद्धात्म्याला प्राप्त होतो.६३
वज्र जसे शक्तिशाली असते तसेच शुद्धात्म्याला शरण गेल्यानंतर त्याचे कोणीच काही अनिष्ट करू शकत नाही. बाह्यपदार्थ कितीही प्रभावी, शक्तियुक्त आणि अमूल्य
SERIES