________________
(३१३)
कोणीच नाही. तरी मोहवश मनुष्य मृत्यूकडे ध्यान न देता स्त्री, पुत्रादी बाह्यपदार्थ, जे कधीच आपले होऊ शकत नाही त्यांच्यात ममत्त्वबुद्धी ठेवून 'मैं मैं' अर्थात 'हे माझे, हे माझे' करत करत व्यर्थ संक्लेशाला प्राप्त होतो. मृत्यू आल्यानंतर त्याचे काहीच राहत नाही.
जे कार्य करता करता मनुष्याचे शरीर गळून जाते, सत्त्वहीन होते आणि इच्छित पदार्थ प्राप्त करण्यासाठी तो असे मानतो की ते आपल्या हातातच आहे. अशा मनुष्याच्या तृष्णेला प्राणाप्रमाणेच बलपूर्वक नष्ट करण्यासाठी तत्पर असणाऱ्या दैवाला तिन्ही लोका कोणाच्याही कडून अवरुद्ध करता येत नाही, त्याचप्रमाणे प्राणांचे हरण करणाऱ्या मृत्यूलाही कोणीच अडवू शकत नाही. ६९
मनुष्याची आशा आकाशाप्रमाणे अनंत असते त्याला पूर्ण करण्यासाठी तो अनेक देवी-देवतांची आराधना करतो परंतु पूर्वकृत कर्माचा उदय त्याच्या आशेवर पाणी फिरवून टाकतात. दैव आणि मृत्यू दोघांना अडविणे असंभव आहे. तेव्हा रक्षणासाठी दुसऱ्यांच्या समोर लाचार बनून हातापाया पडणे अथवा आपल्याला अशरण मानून शोक करणे व्यर्थ आहे. अशावेळी धैर्यच ठेवले पाहिजे.
चक्रवर्ती इंद्र आणि योगेंद्रसुद्धा मृत्यूला टाळण्यास समर्थ नाहीत याविषयी पंडित आशाधर म्हणतात की, 'संपूर्ण पृथ्वीचे स्वामी चक्रवर्ती राजासमोरही यमराज काही आपल्या विक्राल स्वरूपाला व्यक्त करीत नाही का ? आणि काय सुदीर्घ काळापासून चालत आलेल्या प्रिय पत्नीच्या मरणाने इंद्र दुःखी होत नाही का ? अरे, इतकेच काय सांगावे ज्यांच्या तपाचा प्रभाव जगात प्रसिद्ध आहे ते तपस्वी योगी सुद्धा काळरूपी सर्प अथवा वाघाच्या दाढेला नष्ट करण्यात समर्थ नाहीत. म्हणूनच ह्या बाह्य वस्तूचा मुमुक्षू मोह करीत नाही कारण त्या बाह्य वस्तू माझे काहीच बिघडवत नाही किंवा काही सुधारणा करीत नाही.
जे सहा खंडाचे अधिपती आहेत असे चक्रवर्ती समोर असतानासुद्धा त्यांच्या पुत्रांचा मृत्यू होत नाही का ? त्यांच्या अधिपत्याचे सुद्धा यमराजासमोर काहीच चालत नाही.
इंद्राचे आयुष्य सागरोपम प्रमाण असते आणि त्यांच्या राणींचे- इंद्रायणीचे आयुष्य 'पल्योपम प्रमाण' असते. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये तरंग उठतात आणि नष्ट होतात त्याचप्रमाणे इंद्राच्या सागरोपम प्रमाण आयुष्यासमोर इंद्रायणीचे पल्योपम प्रमाणाचे आयुष्य