________________
(३०७)
नष्ट होतात आणि पुण्यवानाला प्रयत्न केल्याशिवाय सहजरूपाने पदार्थ प्राप्त होतात. पण्योदयाने कोणामध्ये गुण नसले तरी यश प्राप्त होते आणि पापाच्या उदयाने गुणवानाला सद्धा अपयश मिळते. ज्याचा प्रतिकार करता येत नाही, असे कर्म उदयास आल्यावर जन्म, जरा, मृत्यू, रोग, चिंता, भय, वेदना इत्यादी दुःखे भोगावीच लागतात. अशा अवस्थेत जीवाचे रक्षण करणारे कोणीच असे नाही की त्याच्या शरणी जाऊन तो रक्षण मिळवू शकेल. आपल्या कर्माच्या उदयाने अर्थात कर्मफल भोगावे लागू नये म्हणून त्यापासून वाचण्यासाठी पाताळात जरी प्रवेश केला तरी कर्मापासून सुटका होत नाही. पर्वताच्या गुंफेत, जंगलात, पर्वतावर, भूमीवर, समुद्रात इतकेच काय लोकाच्या टोकापर्यंत गेला तरी उदयास आलेल्या कर्मातून जीवाची सुटका नाही. दोन, चार अथवा अनेक पाय असलेले प्राणी जमिनीवरच चालतात अथवा राहतात. जलचर मत्स्यादी पाण्यातच राहतात, पक्षी आकाशातच जातात परंतु कर्म सर्वत्र पोहचते. जगात असा कोणताच प्रदेश नाही की जेथे कर्म पोहचत नाही. जेव्हा कर्मोदय होतो तेव्हा हत्ती, घोडे, रथ, योद्धा, साम, दाम, दंड. भेद इत्यादी कोणतेच उपाय शरणरूप होत नाही. कर्मोदय झाल्यावर विद्याधर, बलदेव, वासुदेव, चक्रवर्ती अथवा देवेंद्रासारखे महाबली, महापराक्रमी देखील कोणाला शरणरूप होत नाही. ते सुद्धा रक्षण करू शकत नाही. चालणारा प्राणी भूमी ओलांडून जाऊ शकतो, पोहणारा प्राणी समुद्र पार करू शकतो. परंतु उदयगत कर्माच्या फळाचे उल्लंघन कोणताच महाबली करू शकत नाही. ते सर्वांनाच भोगावे लागते. ज्याप्रमाणे एखाद्या सिंहाने हरणाला पकडले तर दुसरे हरीण त्याचे रक्षण करू शकत नाही त्याचप्रमाणे कर्म उदयास आल्यावर कोणीच शरणरूप होत नाही.५५
आचार्य शिवार्यांनी अशरणतेचे वेगळ्याच प्रकारे प्रतिपादन केले आहे. त्यांच्या सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की जी सुखदुःखे आहेत ती शुभाशुभ कर्माच्या फलस्वरूपी जीवात्म्याला प्राप्त होतात आणि 'कडाण कम्माण न मोक्ख अत्थि' केलेल्या कर्माला भोगल्याशिवाय कदापी सुटका होत नाही. त्याला कोणीच शरण अथवा त्राण देऊ शकत नाही. जन्ममरणाचे मुख्य कारण 'कर्म' आहे. यामध्ये कर्माच्या परिणामांची चर्चा विशेषरूपाने केली आहे.
आचार्य समन्तभद्र ५६ यांनी लिहिले आहे की ज्याप्रमाणे उदयास आलेल्या सूर्याला प्रतिबंध करण्यास कोणीच समर्थ नाही त्याचप्रमाणे उदयास आलेल्या कर्माला प्रतिबंध करण्यास कोणीच समर्थ नाही. कोणालाही शरण गेलो तरी कोणीच रक्षण करण्यास