________________
(३०८)
सक्षम नाही असे समजून साम्यभावाची शरण ग्रहण केल्याने अशुभ कर्माची निर्जरा होईल आणि पुढे नव्या कर्माचा बंध होणार नाही. रोग, वियोग, दारिद्रय, मरण इत्यादींचे भय सोडून धैर्य धारण केले पाहिजे.
वीतराग भाव, संतोषभाव आणि साम्यभाव हेच सर्वदुःखाचा नाश करतील. आपण गरण जाण्यायोग्य उत्तमक्षमा इ. आपल्याच आत्म्यात राहणारे भाव आहेत. क्रोधादी परभाव इहलोकातील जीवनाचा घात करतात. कषाय मंद झाल्यावर इहलोकांच्या हजारो विघ्नांपासून जीवाला मुक्ती मिळते. अशा साम्यभावाला शरण जाणेच योग्य आहे.
जगात रोग निवारण करण्यासाठी औषधोपचार केले जातात आणि त्यामुळे अनेक वेळा रोग नष्टही होतात. परंतु कर्माचा उदय बलवान असेल तर औषधी सुद्धा गुणकारी न ठरता विपरीत फळ देण्यासाठी कारणीभूत होतात.
सांगण्याचा मतितार्थ हा आहे की असतावेदनीय कर्माचा उदय जेव्हा प्रबळ होतो तेव्हा औषध वगैरे उपचारसुद्धा विपरीत परिणाम करतात. जेव्हा असता वेदनीय कर्माचा उदय मंद होतो किंवा उपशम होतो तेव्हा कोणताही उपाय लागू होतो. कारण कमी शक्ती असणाऱ्याचा प्रतिकार एखादी दुर्बळ व्यक्तीसुद्धा करू शकते. ती बलवानाचा प्रतिकार करू शकत नाही. वर्तमान काळात शुभ कर्म उदयास आणण्यायोग्य बाह्य सामग्री अत्यंत कमी आहे आणि अशुभ कर्माला उदयास आणण्यासाठी लागणारी सामग्री विपुल आहे म्हणून अल्प सामग्री, अल्पज्ञान, अल्पपुरुषार्थाने असाता कर्माच्या उदयाला कसे जिंकावे?
एखाद्या मोठ्या नदीचा प्रवाह जोरात, वाकड्या तिकड्या मार्गाने वाहू लागला आणि त्यात कोणी उत्तम पोहणारा असला तरी त्या प्रवाहाच्या उलट्या दिशेत पोहू शकणार नाही. परंतु जर तो प्रवाह मंद असेल तर पोहण्याची कला जाणणारा मनुष्य त्याच्यातून पार होऊ शकतो असे पाहता साधकाने सतत असा विचार केला पाहिजे की प्रबळ कर्माचा उदय झाल्यावर मला कोणीच वाचविणारा नाही. या जगात पृथ्वी आणि समुद्र हे दोन पदार्थ सर्वात मोठे आहेत. त्यात पृथ्वीला प्रदक्षिणा करणारे आणि समुद्र तरून पार करणारे खूप आहेत. परंतु कर्माच्या उदयाने तरणारे कोणी दिसत नाही. संसारामध्ये उत्तमक्षमा, मार्दव इत्यादी दहा धर्मांमुळे अनेक दुःखे, अपमान नष्ट होतात. मंद कषायाने सुख, आत्मरक्षण, निर्मळ किर्ती, उच्चस्थान इत्यादी अनेक प्रकारची सुखसामग्री प्राप्त होते. त्याचे प्रत्यक्ष फळ आहे असे समजून त्याचीच शरण घेतली पाहिजे. व्यवहारामध्ये प्रत्येक जीवाने