________________
(३०६)
कुंदकुंदांनीसुद्धा असे सांगितले आहे की, 'अर्हन्त, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू हे पाच परमेष्ठी आपल्या शुद्ध आत्म्यातच निवास करतात म्हणून शुद्धात्माच एकमेव माझ्यासाठी शरण आहे.५१
निश्चयाने जीवमात्रांसाठी आत्माच शरण आहे. तो निजस्वभावाचा अनुभव घेतो. त्याच्यासाठी अन्य कोणाची शरण नाही. वास्तविक अर्हत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू ह्या पाचही आपल्या आत्म्याच्या अवस्था आहेत. या सर्व अवस्था 'स्व' स्वभावाची शरण ग्रहण केल्याने उत्पन्न होतात. आगमामध्ये शुद्धात्मा, पंचपरमेष्ठी धर्म आणि रत्नत्रयाची शरण ग्रहण करण्याचे सांगितले आहे. वस्तुतः हे सर्व शुद्ध स्वभावात स्थित आहेत. जो आपल्या शुद्ध स्वभावाचा एकदा आश्रय घेतो त्याला अन्य कोणाला शरण जाण्याची इच्छा होत नाही.
सम्यगदर्शन, सम्यगज्ञान, सम्यकचरित्र आणि सम्यक्तप ह्या चारही गोष्टी आत्म्यातच स्थित असतात. आत्माच यांची साधना, आराधना करून सर्व दु:खापासून मुक्त होतो, सिद्धी प्राप्त करतो. म्हणून वस्तुतः आत्माच शरणरूप आहे.५२
वट्टकेराचार्य लिहितात की, घोडे, हत्ती, रथ, मनुष्य, बल, वाहन, मंत्र औषधी, विद्या, माया, नीती आणि बंधुवर्ग हे मृत्यूच्या भयापासून रक्षण करू शकत नाही.५३
जीवितुमिच्छा-जगण्याची इच्छा प्रत्येकामध्ये व्याप्त असते. मनुष्य विचार करतो की हत्ती, घोडे इत्यादी वैभव, सेवक, स्वजन इत्यादी मनुष्य, बल, वाहन, मंत्र हे माझे रक्षक आहेत. रुग्ण झाल्यावर औषधी, मंत्र, तंत्रादी विद्या मला वाचवू शकतील. बंधुवर्ग, कुटुंबातील लोक माझे रक्षण करतील. परंतु सत्य हे आहे की मृत्यूच्या भयापासून कोणीही वाचवू शकत नाही.
जन्म, जरा आणि मृत्यू ह्या जगात प्राण्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यांचे निवारण करण्यात कोणीही समर्थ नाही.५४ केलेल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला कोणीच अडवू शकत नाही. कोणते कर्म केव्हा आणि कशारूपात उदयास येईल ते सर्वज्ञाशिवाय कोणीही काहीच सांगू शकत नाही.
____ ज्ञानावरणीय कर्म अशाप्रकारे अज्ञानतेला आणतात. त्याचे निवारण करण्यासाठी कोणीही शरणरूप नाही. त्याचे निवारण करण्याचा काही उपाय नाही. असातावेदनीय कर्माच्या उदयामुळे अमृतसुद्धा विष होते, तृणसुद्धा शस्त्र होते आणि बंधुबांधवही शत्रू होतात. पाप अर्थात लाभान्तराय कर्माच्या उदयाने मनुष्याच्या हातात आलेले पदार्थही