________________
(३०५)
प्रकंपित आहेत. मानवहृदय सतत दुःखाने जळत आहे. मनुष्य असहाय आहे, निरुपायी आहे, कोणाची शरण घ्यावी ?
भारतीय साधनापद्धतीमध्ये भक्ती मार्गाचा सर्वाधिक प्रभाव आहे. भक्तीचे मूळ 'अशरण भावना' आहे. भक्त परमात्म्याला एकमेव शरण मानून संसारातून विरक्ती स्वीकारून पूर्ण समर्पणामध्ये विश्वास ठेवतो. समर्पण भावनेची एक प्रसिद्ध गाथा आहे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम |
-
तस्मात् कारुण्य भावेन, रक्ष रक्ष जिनेश्वर ।
जेव्हा जीवनामध्ये दुःखाची वादळे येतात, आपत्तीच्या बीजा कडकडू लागतात आणि कष्टाची मेघगर्जना होते तेव्हा व्यक्ती स्वतःला वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळते, आश्रय शोधते. ती एखाद्या अशी व्यक्ती अथवा वास्तूची शरण घेण्याची इच्छा करतो की ज्यामुळे ती सुरक्षित राहावी. या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी बहुमूल्य साधनांचा संग्रह करते आणि समजते की आता माझे जीवन सुरक्षित राहील. सुखपूर्वक व्यतीत होईल.
परंतु आगमग्रंथात आणि आगमोत्तरकालीन कुंदकुंदाचार्यापासून आजपर्यंतच्या आचार्यांनी आणि विद्वानांनी अशरण भावनेच्या माध्यमातून या जगात अशरण काय आहे आणि कोणाची शरण ग्रहण केली पाहिजे याचे विस्तृत विवेचन केले आहे.
तात्त्विकदृष्ट्या पाहता कोणालाही स्वतःच्या आत्म्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही शरण नसते, जन्म, जरा, मृत्यू, रोग, भय यांपासून आत्म्याचे रक्षण करणारा त्याचा आत्माच आहे. बंध, उदय आणि सत्तारहित शुद्ध आत्माच शरणरूप आहे. ५०
दुसऱ्याची शरण घेण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाही. पुरुषार्थाने सर्व काही प्राप्त होऊ शकते. जगाची शरण घेणारा कधी जिंकत नाही आणि आत्म्याची शरण घेणारा कधी हारत नाही. जो दुसऱ्याची शरण घेतो तो रिकाम्या हातांनी परत येतो. त्याला काहीच प्राप्त होत नाही. जो स्वतःला शरण जातो त्याला काहीच प्राप्त करण्याचे बाकी राहत नाही.
तिसऱ्या प्रकरणामध्ये आवश्यक सूत्राच्या अंतर्गत अरिहंत सिद्धांची शरण घ्यावी या विषयावर चर्चा केली. स्वाभाविकच असा प्रश्न पडतो की अरिहंत, सिद्ध, साधू आणि धर्माच्या शरणी जाणे म्हणजे दुसऱ्याच्या शरणी जाणे नव्हे का ? याचे समाधान असे आहे की, या सर्वांना शरण जाणे म्हणजे स्वतःलाच शरण जाणे असा अर्थ आहे. आचार्य