________________
(३०४)
भगे गंजारवाच्या निमित्ताने जणू काही गीत गात आहेत, हवेच्या प्रेरणेने शाखारूपी भुजांद्वारे नत्य करीत आहेत अशा रमणीय गुणांनी युक्त वृक्षाची राजाने कौतुकवश एक मंजिरी तोडली. त्यामुळे आपल्या स्वामींच्या मार्गाचे अनुकरण करणाऱ्या सेवकांपैकी कोणी मंजिरी, कोणी कोमल पाने कोणी गुच्छ, तर कोणी फांद्यांचे अग्रभाग, तर कोणी कच्ची फळे तोडून क्षणात त्या वृक्षाला खांबासारखा करून टाकला. नंतर पुढे जाऊन मनोहर, विकसित, थंड प्रदेशाच्या उद्यानात पोहचले. तेथे थोडावेळ थांबून पुन्हा त्याच मार्गाने निघाले. राजाला तेथे तो वृक्ष न दिसल्याने त्यांनी लोकांना विचारले की तो आम्रवृक्ष कोठे आहे? तेव्हा लोकांनी स्तंभरूप झालेल्या त्या आम्रवृक्षाला दाखविले. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाने विचारले 'हा असा कसा झाला ?' लोकांनी पूर्वी घडलेली सर्व गोष्ट सांगितली हे ऐकून परम संवेगाला प्राप्त झालेला राजा सुद्धा अत्यंत सूक्ष्म बुद्धीने विचार करू लागला की, 'अहो! संसाराच्या दुष्ट चेष्टेचा धिक्कार असो. कारण येथे एकही अशी वस्तू नाही की जिचा सर्वप्रकारे नाश होत नाही.
या आम्रवृक्षाप्रमाणेच बुद्धिमानांना अनित्यतेने व्याप्त स्वशरीर इत्यादी सर्व वस्तूंमध्येही आसक्ती का उत्पन्न होते ? अशाप्रकारे विविध वस्तूंच्या अनित्यतेचे चिंतन करून महासत्त्वशाली राजा राज्य, अंत:पुर आणि नगर सोडून प्रत्येकबुद्ध चरित्र युक्त साधू झाले. या दृष्टांतावरून प्रत्येक साधकाने सर्व पदार्थांच्या अनित्यतेचे चिंतन मनन केले पाहिजे.४९
ह्या भावनेच्या चिंतनाने जीव आपल्या आत्म्याच्या शाश्वत, अखंड आणि चिदानंदस्वरूपाचा साक्षात्कार करून सुखाचा अनुभव घेतो. यथार्थतेला समजून दुःखातून सुख प्राप्त करण्याची कला ह्या भावनेच्या चिंतनाने प्राप्त होते. अनासक्तीचा विकास होतो. ममत्वाचे विलिनीकरण होते आणि मूढतेचे अपनयन होते.
अशरण भावना अनित्यभावनेद्वारा संसाराच्या स्वरूपाचे यथार्थ चित्रण केलेले आहे. अनित्यतेचा बोध झाल्यावर आता आपण याच्यावर विचार करू की जी वस्तू अनित्य आहे ती शरणदायी होऊ शकेल का ? ज्याचा पायाच अस्थिर आहे त्यावर इमारत उभी राहू शकत
नाही.
संपूर्ण संसार दुःखाच्या ज्वालांमध्ये जळत आहे, कोठेही सुख नाही. झोपडीत राहणारे कष्टाने व्याकूळ आहेत तर सुवर्ण मंहालात राहणारे आपल्या वेगळ्याच दुःखाने