________________
MENTS
RASHTRA
(२८८)
Joid
S
Most
SPO EoH0
SAVERTISMATION
N Sapurna SOCIETYRDS
PRANASISAMARTIST
2010
हत्ती, घोडा, रथ, पायदळ, धन, सुवर्ण इत्यादींची वृद्धी, ऋद्धी आहे. शुभ, कल. उत्तमपदार्थ यांद्वारे इंद्रियांना जो आनंद मिळतो ते सौख्य आहे. आई-वडील, वातील लोक, नातेवाईक इत्यादींबरोबर एकत्रित राहणे म्हणजे 'संवास' आहे. त्यांच्या यी मनात जो स्नेह अथवा प्रेम उत्पन्न होते ती प्रीती आहे. मानवाला ह्याविषयी मोठे आकर्षण असते. यांना प्राप्त करणे म्हणजे सौभाग्याचा विषय मानला जातो. तसेच समजले जाते की मला जे काही प्राप्त झाले आहे ते चिरकाल राहील. ही मनुष्याची सर्वात मोठी भ्रांती आहे. कारण संसारातील सर्व सुखे विद्युल्लतेप्रमाणे चंचल आहेत. जशी आकाशामध्ये वीज चमकते आणि क्षणात नष्ट होते तीच गोष्ट भौतिक सुखांच्या बाबतीत घडते. ज्याप्रमाणे वीज दृश्य-अदृश्य होते, पाहता पाहता नष्ट होते त्याचप्रमाणे सुखसुद्धा दृश्यअदृश्य होत असते ती सर्व स्थाने, गाव, नगर इत्यादी ज्या ठिकाणी मानव राहतो, आसक्त होतो ते सर्व काही नश्वर आहे. यांना अविनाशी अथवा ध्रुव मानून राहणारे जेव्हा त्यांच्या पासून हे सुख दूर होते तेव्हा त्यांना खूप संताप होतो, संक्लेश होतो.
येथे टीकाकार आचार्य श्री अपराजितसूरी यांनी 'स्थान' शब्दाची व्याख्या करताना सांगितले आहे की शुभ अथवा अशुभ परिणामाने बद्धगती नाम, कर्म, यांच्या फलस्वरूपी मिळणारी मनुष्य, देव, तिर्यंच आणि नरक योनीरूपी पर्याय अथवा स्थान त्या नौकेप्रमाणे
आहे, ज्यामध्ये यात्री आरूढ होतो आणि आपल्या गन्तव्य स्थानी पोहचल्यानंतर त्या नावेला सोडून देतो. हीच गोष्ट पिता-पुत्र, स्वामी-सेवक, भाऊ-बहीण इत्यादी संबंधाबरोबर जोडलेली आहे. ती मेघपटलाप्रमाणे अनित्य आहे. आचार्य शिवार्यांनी जनमानसामध्ये लौकिक सुखाच्या विनाशशिलतेला सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरणे देऊन विस्ताराने वर्णन केले आहे. अत्यंत सुंदर लिहिले आहे -
ज्याप्रमाणे पक्षी दिवसा किलबिलाट करतात, उडतात, एकत्रित येतात परंतु सूर्यास्त झाल्यानंतर ते असा कोणताही संकल्प अथवा विचार करीत नाही की आपण अमुक वृक्षावर पुन्हा भेटू. संयोगाने ते एकमेकांना भेटतात आणि विलग होतात. सांसारिक प्राण्यांचा साथ सुद्धा असाच आहे. काळरूपी हवेच्या झोक्याने प्रेरित होऊन ते कुलरूपी वृक्षावर काही काळासाठी भेटतात परंतु त्यांचा तो मिलाप शाश्वत नसतो. त्यांचा पुन्हा वियोग होतो. सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी अस्त होतो याप्रमाणे ऐश्वर्य, प्रभुत्व, आरोग्य इत्यादी विलुप्त होतात.१४
मिथ्यादृष्टी, जीव, ऐश्वर्य इत्यादींना आपल्या हिताचे मानतात परंतु ज्यांना