________________
(२८९)
स्वरूपाचे ज्ञान आहे तो परक्याला स्वतःचे कसे मानू शकेल ? संसारामध्ये स्वजनांच्या संबंधामुळे अनेक प्रकारची पापकर्मे करावी लागतात. परंतु ते संबंध नित्य नाहीत. ते नेहमी टिकून राहत नाही. ह्याशिवाय मनुष्य उपजीविकेच्या साधनाला आपले समजून त्यासाठी हिंसा, असत्य, कपट, चोरी इत्यादी करण्यात प्रवृत्त होतो. अनेक जीवांना धोका देवून, फसवून स्वतःच्या पोटाचा आणि पेटीचा खड्डा भरतो. आपल्या शक्ती आणि सत्तेच्या बळावर निर्बळांना धमकावून त्यांच्याजवळून बळजबरीने पैसे लुटतो अशा पापयुक्त परिग्रहाचा संग्रह सुद्धा कोठे नित्य आहे.
मनुष्य ज्यांच्यावर अतिशय प्रेम करतो ते लोकसुद्धा स्वार्थी आहेत. डोळ्यांच्या लालीमेप्रमाणे त्यांची प्रीत सुद्धा नष्ट होते. चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्र इत्यादी अस्त झाले तरी पुन्हा त्यांचा उदय होतो. वसंत, ग्रीष्म इत्यादी ऋतू जातात व येतात परंतु एकदा नष्ट झालेले यौवन, आयुष्य इत्यादी कधीच पुन्हा येत नाही.
ज्या शरीराच्या आधारावर आपले जीवन आहे त्या शरीराला जर्जरीत करणारी 'जरा' क्षणोक्षणी जवळ येत आहे. ती तारुण्यरूपी वृक्षाला दग्ध करण्यासाठी दावाग्नीसारखी 'स्त्री'च्या प्रीतीरूपी हरिणीला वाघाप्रमाणे, ज्ञानरूपी नेत्रांना नष्ट करण्यासाठी धुळवृष्टीसारखी तपरूपी कमळवनाला नष्ट करण्यासाठी बर्फासारखी आहे. सौंदर्यरूपी धन चोरण्यामध्ये, शक्ती नष्ट करण्यामध्ये, आलस वाढवण्यात, स्मरणशक्ती नष्ट करण्यात, पायाची शक्ती हरण करण्यात, 'जरा' बलशाली आहे. म्हणूनच जोपर्यंत डोळ्यात तेज, पायात जोर आणि आत्म्यात विचार करण्याची शक्ती आहे तोपर्यंतच जे नित्य आहे त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. १५
मोहवश अज्ञप्राणी शरीर इत्यादींमध्ये नित्यतेचा अनुभव करतो परंतु वस्तुतः आत्म्याच्या ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोगाशिवाय ह्या संसारामध्ये कोणतेच पदार्थ ध्रुव नाहीत अशाप्रकारे सतत चिंतन केले पाहिजे. १६
आत्म्यामध्ये रागादी परिणामामुळे कर्म आणि नोकर्माच्या रूपाने ज्या पौदगलिक द्रव्याला ग्रहण केले आहे अर्थात रागादीमुळे जे कर्म पुदगल आकृष्ट केले आहे ते 'पुदगल द्रव्य' आणि 'परमाणू' इत्यादी सर्व पुदगल द्रव्यदृष्टीने नित्य असले तरी पर्याय दृष्टीने त्यामध्ये क्षणोक्षणी पर्यायांचे परिवर्तन होत राहते. जी अवस्था पहिल्याक्षणी असते ती दुसऱ्याक्षणी बदलून जाते. त्याचे स्थान दुसरी अवस्था घेते. ज्याप्रमाणे पुष्पमालेसारख्या सुगंधी पदार्थांचा प्रयोग करून फेकून दिली तरी त्या पदार्थांच्या वियोगामुळे मनामध्ये