________________
(२८६)
समावेश होतो आणि बारा भावनांमध्ये संवर भावना आणि निर्जरा भावनेचा सुद्धा समावेश होतो. म्हणून तेथेच त्याचे विशेषतेने विश्लेषण केले जाईल. येथे एवढेच सांगायचे आहे की जैन धर्माचा मूळ सिद्धांत ह्या भावनेअंतर्गत आहे.
वस्तुस्वरूपाचे ज्ञान होणे म्हणजे भावना होय. आत्मसाधनेमध्ये भावनेचे सर्वाधिक महत्त्व आहे. भावना अध्यात्म साधनेचा प्राण आहे. ह्या भव बंधनाचा नाश करणाऱ्या आहेत. 'भव भ्रमण' आणि 'कर्मबंधनाचे कारण राग आणि द्वेष आहे परंतु जेव्हा व्यक्तिंच्या अंतरमनामध्ये भावनेचा प्रवाह प्रवाहित होतो तेव्हा चिंतनाची ज्योत प्रज्वलित होते. तात्त्विक आणि आध्यात्मिक चिंतन, मनन जेव्हा खोलवर होते जेव्हा रागद्वेषाचा प्रवाह थांबतो आणि कर्मागमनाचा प्रवाह अर्थात आस्रवाचा प्रवाह थांबल्याने आणि भावसहित साधना केल्याने पूर्व कर्माचाही क्षय होतो. परंतु साधनेबरोबर भावना असेल तरच ती साधना कर्मक्षयाचे कारण होऊ शकेल. दान, शील, तप यांबरोबर जर भावना नसेल तर ती साधना केवळ पुण्यबंधाचे कारण होईल आणि भावपूर्वक अथवा ज्ञानपूर्वक केलेल्या साधनेने कर्माची निर्जरा होईल.
बलभद्रमुनींना पारणा देण्याच्या भावनेने युक्त मृगाने ( हरणाने) काहीच दान दिले नाही तरी भावनेच्या श्रेष्ठतेमुळे त्याला दानासारख्याच फळाची प्राप्ती झाली.
दान करण्यासाठी धनाची, शील आणि तप करण्यासाठी संघयनाची (शारीरिक बळाची) आवश्यकता आहे परंतु भावनेमध्ये कोणत्याही अन्य वस्तूची अपेक्षा नसते.
'आचार्य श्री आनंदऋषी महाराजांनी अनित्यादी बारा भावनांला वैराग्यभावना ही संज्ञा दिली आहे. यांना 'वैराग्याची माता' म्हटले आहे. वस्तुतः या भावना वैराग्यप्रधान आहेत. यांच्या चिंतनात गूढ वैराग्य भरले आहे. पदोपदी निर्वेद रस झळकत आहे म्हणून यांना 'वैराग्यभावना' संबोधिणे अधिक उचित वाटले असेल. १०
बारा वैराग्य भावना
अनित्य भावना
बारा भावनांच्या स्वरूपाचे सूक्ष्मतेने निरीक्षण केले तर असे प्रतीत होईल की मनुष्याच्या मनावर सर्वाधिक प्रभाव सांसारिक पदार्थाचा आहे. त्यांना पाहून तो अनुकूलतेचे आणि सुखाचे दर्शन करतो तो मोहांधतेमुळे हे विसरतो की हे पदार्थ शाश्वत नाहीत. त्यांचे वास्तव्य एका नियमित काळाच्या मर्यादित बद्ध आहे. मानवी मनातून यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या मनात हा विचार दृढ करण्याची आवश्यकता आहे की