________________
(२८५)
...
मध्ये तल्लीन होते. तेव्हा हे श्रेणिक आपण दुसऱ्यावेळी विचारले. त्यावेळी त्यांचे
सिद्ध विमानात जाण्यायोग्य होते. अशी चर्चा चालली होती तेवढ्यात देवदंदभी चा ध्वनी ऐकू आला. श्रेणिक राजाने प्रभुंना विचारले, 'हे काय आहे ?' तेव्हा प्रभू माले "प्रसन्नचंद्र मुनींना केवलज्ञान झाले. त्यांच्या महिमेचे गुणगान देवता करत आहेत त्यामुळे देवदुंदुभी इत्यादींचा ध्वनी होत आहे.
अपूर्व बोध देणारा हा दृष्टांत आहे. दुर्मुखचे वचन ऐकून मुनी दुर्ध्यानात गेले. होण्याचे लुंचनरूपी द्रव्य चारित्र्याला पाहून सावधान झाले. आत्मनिंदा करू लागले. शुभ ध्यानात पुढे गेले, सर्वार्थसिद्ध विमानात जाण्यायोग्य झाले. त्यापुढे गेले तर केवलज्ञान झाले. ह्यामध्ये शुभ भावनेचे प्राधान्य आहे. म्हणूनच भावना ही संसार सागरामध्ये बुडणाऱ्याला तारणारी आहे.८
आत्मस्वरूप समजल्यावर जो आनंद प्राप्त होतो त्या आनंदाला ह्या भावना प्रकट करतात. ह्या शुद्ध भावना सत्याचे ज्ञान करून देतात. एका श्लोकामध्ये अत्यंत सुंदरपणे लिहिले आहे -
"दारिद्रय नाशनं दानं, शीलं दुर्गति नाशनम् ।
अज्ञाननशिनी प्रज्ञा, भावना भवनाशिनी ।।९ दान केल्याने दरिद्रतेचा नाश होतो, शीलाचे पालन केल्याने दुर्गतीचा नाश होतो, प्रज्ञाने अज्ञानतेचा नाश होतो आणि भावनेने भव अर्थात संसाराच्या परिभ्रमणाचा नाश होतो. जसे सर्व रसामध्ये मुख्य रस मीठ आहे तसे धर्माचे अंग दानादी आहेत. ते भावनेशिवाय फलदायक होत नाहीत. जैन साधू, साध्वी जेव्हा श्रावकांना, साधकांना मंगल पाठ ऐकवितात तेव्हा शेवटी साधक जो दोहा म्हणतात त्यात भावनेचे महत्त्व प्रकट होते
"भावे भावना भावीओ, भावे दीजे दान,
भावे धर्म आराधिये, भावे केवल ज्ञान ।' भावसहित भावनेने भावित झाले पाहिजे, भावनेसह दान दिले पाहिजे, धर्माराधना भावनेसहित केली पाहिजे आणि केवलज्ञान सुद्धा भावनेने होते. जसे उपरोक्त प्रसन्नचंद्र राजर्षी यांच्या दृष्टांतात पाहिले.
जैन दर्शनामध्ये नवीन कर्माला अवरोध करण्यासाठी संवर साधना दाखवली आहे. आणि जे कर्म पूर्वी होऊन गेले आहे त्यांना नष्ट करण्यासाठी निर्जरा करणे अर्थात बारा प्रकारचे तप करण्यास सांगितले आहे. ह्या संवर आणि निर्जरमध्ये बारा भावनांचा अनप्रेक्षेचा
S TERDHMEDISonnimicracheeniwarAMAvailaalaimantihisahnibinalistassaintainistiannunciati........
niedekarwactoanRRESI
cleanliandhyanlinesistandinisandwicbindsashanilajunsistiwwsViralasacLISJunisiasmikanaissanlsdacicialpur