________________
(२७८)
म झाला. संतोषवृत्ती, स्वार्थ आणि संग्रह यामध्ये बदलल्यामुळे संघर्ष वाढत गेला. दया, दारता, सहृदयता यांसारखे गुण मानवाच्या हृदयात राहिले नाहीत.
संग्रह, स्वार्थ आणि संघर्षाच्या भावनेमुळे एकीकडे दोन व्यक्तींमध्ये भांडणे सुररू झाली, तर दुसरीकडे राज्यविस्ताराच्या लोभात दोन राष्ट्रांमध्ये युद्धाची स्थिती उत्पन्न झाली. पराजित राज्यांवर स्वतःचे शासन अबाधित ठेवण्यासाठी विजयी राज्याने दंडविधान प्रणाली सुरू केली. आधी तर हुंकार प्रणालीसुद्धा अपराध्याला जास्त अपमानास्पद वाटत होती अर्थात 'काय, तुम्ही असे केले ?" अशा प्रकारच्या वचनांमुळे अपराधी व्यक्ती समाजाला आपले तोंडसुद्धा दाखवत नसे किंवा मान वर करून कधी चालत नसे. हळूहळू ह्या दंड विधानाचा प्रभाव कमी झाला आणि “माकार" नावाची दंडविधान प्रणाली सुरू झाली. 'माकार'चा अर्थ 'असे करू नका.' काळाच्या प्रभावाने 'माकार'ने सुद्धा काम चालले नाही तेव्हा "धिक्कार" शब्दाने दंडव्यवस्था चालवली अर्थात "धिक्कार आहे तुझा" अशाप्रकारे कालक्रमाने मानवी मन दिवसेंदिवस मोहांधतेमुळे अधिकाधिक धीट, कठोर होऊ लागले.
आज आपण समजू शकतो की आता दंडविधान कोठपर्यंत पोहचले आहे. आज फाशीच्या शिक्षेची सुद्धा लोकांना भीती राहिलेली नाही. 'मरणे' आणि 'मारणे' ह्यामुळे आज लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारची चलबिचल होत नाही. अशा परिस्थितीत लोकांच्या मनाचे परिवर्तन करण्याची अत्यंत आवश्यकता वाटू लागली आहे. परंतु हे परिवर्तन दंडविधानाने सुद्धा होणार नाही. परंतु भाव परिवर्तनाने होऊ शकेल असा विचार करूनच आगमोत्तर कालीन साहित्यात आचार्यांनी भावनेचे आपल्या रचनेत विशद विवेचन केले असावे.
__ आजची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की मानव भौतिकतेकडे अधिक आकर्षित झाला आहे. त्याचे आकर्षण आणि आसक्ती पापाचे, दुःखाचे आणि संघर्षाचे कारण झाल्याने भौतिक पदार्थांची अनित्यता, अशरणता, अशुचिता समजून त्यांचे आकर्षण कमी करण्यासाठी आणि आनवाची हेयता आणि संवर व निर्जरेची उपादेयता इत्यादींचे दिग्दर्शन करण्यासाठी आगमाच्या अनुसंधानानेच सुव्यवस्थित आणि विशद रूपात आगमोत्तरकालीन विद्वानांनी, आचार्यांनी ह्या विषयावर रचना केल्या त्यात दिगंबर आणि श्वेतांबर दोन्ही परंपरेचे लेखक आहेत.
आगमामध्ये भावनेविषयी जे वर्णन झाले आहे ते अत्यंत संक्षेपात आणि साकतिक आहे. असे प्रतीत होते की भावनेचा क्रमशः विकास होत गेला. कारण साधनेच्या
Boms
e
ase