________________
(२७७)
प्रकरण पाचवे आगमोत्तर काळात व आधुनिक जैन साहित्यात
भावना अथवा अनुप्रेक्षा
HABARR
O RATIONIANTARE
आगमोत्तरकालीन आणि आधुनिक जैन साहित्यात भावनेचे निरूपण
आगम ग्रंथाच्या अपेक्षेने आगमोत्तर ग्रंथामध्ये शुभ भावनेचे विस्तृत विवेचन प्राप्त होते. ह्यामागे नक्कीच काही कारण असावे. कारण भावना तर प्रत्येक जीवाच्या हृदयात अनादी काळापासून आहे. मग त्या भावनेविषयी विशिष्ट आगम ग्रंथ का नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. ह्याचे समाधान असे आहे की अनंत काळापासून संस्कृतीचा कधी व्हास होत असतो तर कधी विकास. हा हास व विकासाचा क्रम सतत चालूच असतो. ह्या अवसर्पिणी काळामध्ये तीन आऱ्यापर्यंत सुखाचे साम्राज्य होते. आजच्या काळाप्रमाणे कुटुंब आणि समाज विघटित नव्हते. स्त्री-पुरुषांमध्ये सहजर्याची भावना होती. स्वतःची गरज स्वत:च्या व्यक्तिगत साधनसामग्रीतून आणि शक्तीद्वारे पूर्ण करीत होते. लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारे आसक्ती नव्हती. आसक्ती नसल्याने अथवा वस्तूवर अधिकाराची अथवा संग्रहाची भावना सुद्धा नव्हती. आसक्तीच अधिकाराची किंवा संग्रहाची भावना वाढविते. ही भावना स्वार्थ आणि द्वेषाला जन्म देते. अशी भावना पूर्वी नसल्याने आणि जीवनोपयोगी पदार्थांची विपुलता आणि सुलभता असल्याने संग्रहाच्या भावनेला आश्रयच मिळत नव्हता, जीवन संतोषमय असल्याने अनित्यादी भावनांचा अधिक उपदेश करण्याची आवश्यकता नव्हती. पण जरी संग्रहित रूपाने भावनेचे वर्णन मिळत नसले तरी सर्वज्ञ, सर्वदर्शी तीर्थंकर भगवान त्रिकालज्ञानी होते. यापुढे येणाऱ्या काळाला लक्षात घेऊन आगमग्रंथामध्ये ठिकठिकाणी भावनेचे तुटक-तुटक रूपात वर्णन केलेले आहे. याचे वर्णन तृतीय प्रकरणात झाले आहे.
आज काळ बदलला आहे. मानवाच्या मनात पदार्थाच्या नियमित उपयोगितेशिवाय अनियमित उपयोगाची भावना वाढू लागली आहे. त्याचबरोबर संग्रह आणि संरक्षणाची भावनाही निर्माण होऊ लागली आहे. परिणामतः पदार्थाचा अभाव भासू लागला आहे. स्वार्थ संग्रह आणि संरक्षणाच्या भावनेने द्वेषाला पोषण मिळाले, त्यामुळे पारस्परिक प्रेमभाव, जो अतिशय भोग दिल्याने प्राप्त होतो त्याचा घात केला. यापासून संघर्षाचा