________________
(२७९)
गाचे फार महत्त्व आहे. म्हणूनच उत्तरवर्ती काळात बारा भावनांचे विस्तृत विवेचन
प्राप्त होते.
ह्याच्या पूर्व प्रकरणात आपण अशुभ भावनेचे प्रकार त्याचे फळ आणि त्याच्या बचे विवेचन पाहिले. ह्या प्रकरणात शुभ भावनेचे महत्त्व आणि अनित्यादी बारा भावनांचे योत्तर काळात जे साहित्य लिहिले गेले आहे त्याचे सार स्वरूपात दिग्दर्शन करू.
प्रस्तुत ग्रंथाचा विषय 'भावना योग' आहे म्हणून प्रथम भावनेबरोबर जो योग शब्द आहे त्याचा अर्थ समजून भावनेचे विवेचन करू.
भावनेबरोबर योग शब्दाची उपयोगिता विश्वचा प्रत्येक आत्मा अनन्त आणि अपरिमित शक्तीचा पुंज आहे. त्याच्यात अनन्तज्ञान, अनन्त दर्शन, अनन्त सुख-शान्ती व अनन्त शक्तीचे अस्तित्व विद्यमान आहे. तो स्वतः आपला विकासक आहे आणि स्वतःच विनाशक (Destroyer) आहे. इतक्या विराट शक्तीचा अधिपती असताना पण तो इतस्तत: भटकत आहे त्याचे कारणजीवनात योग - स्थिरतेचा अभाव आहे. आणि जीवनात एकाग्रता, स्थिरता व तन्मयता नसल्याने त्याला स्वतःवर, स्वत:च्या शक्तीवर पूर्ण भरोसा नाही. त्यामुळे अनन्त शक्तीचा प्रकाश आवृत झाला आहे, झाकला गेला आहे. म्हणून अनन्त शक्तीला अनावृत्त करण्यासाठी, आवरण दूर करण्यासाठी, आत्मज्योतीला प्रज्वलित करण्यासाठी, आणि आपल्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी मन, वचन आणि कायाची एकरूपता, एकाग्रता, तन्मयता व स्थिरता असणे आवश्यक आहे आत्मचिन्तनामध्ये एकाग्रता स्थिरता आणण्याचे नाव 'भावना योग' आहे. भावनेचे तर विस्तृत विवेचन ह्या ग्रंथात केले जाईल पण योग शब्दाची जोडणी भावनेबरोबर असल्याने प्रथम योग शब्दावर विचार करू.
'योग'चा अर्थ 'योग' शब्द युज् धातू आणि धृञ् प्रत्ययाने झाला आहे. संस्कृत व्याकरणात 'युज्' धातू दोन आहेत. एकाचा अर्थ जोडने, संयोजित करणे आहे व दुसऱ्याचा अर्थ समाधी मनस्थिरता आहे.१ इथे आपण जोडणे अर्थ घेऊ. भावना आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा सर्वोत्तम योग आहे. 'भावना योग' म्हणजे आत्म्याचे आत्म्यामध्ये मिलन आहे. आत्म्याचे आत्म्यामध्ये रमण आहे.
__ जैन आगमात योगचा अर्थ मन वचन कायाची प्रवृत्ती आहे.२ योग शुभ व अशुभ दोन्ही प्रकारचे आहेत. त्याचा निरोध करणे हाच साधनेचा मुख्य उद्देश्य आहे.
जैन धर्म निवृत्तीप्रधान आहे. ह्यांचे चरम तीर्थंकर भगवान महावीरांनी साडेबारा
M