________________
(२६८)
सम्मोह भावनेचे वर्णन उत्तराध्ययन सूत्रात प्राप्त होत नाही. 'सम्मोहचा' अर्थ मोह किंवा मूढता. बृहत्कल्पइत्यादीमध्ये आसुरी भावनेनंतर सम्मोह भावना सांगण्यात आहे तसाच क्रम गीतेमध्ये देखील आढळतो. तेथे देखील म्हटले आहे.
'क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः' (गीता २/६३) क्रोधामुळे यंत मढता निर्माण होते आणि मोह-मूढतेमुळे स्मृतिविभ्रम होतो. क्रोधामुळे आसुरी भाव येतात. मोहाचे सघन आवरण बुद्धीवर पडते. बुद्धीमध्ये विभ्रम विक्षिप्तता आणि चंचलता निर्माण होते.
"स्मृतिभ्रंशाद् बुद्धि नाशो बुद्धि नाशात् प्रणश्यति ।"
सम्मोह मनुष्याच्या विनाशाची अन्तिम स्थिती आहे. जोपर्यंत प्राणी मोहाने घेरलेला राहतो, तो अज्ञानाच्या दलदलीतून मुक्त होऊ शकत नाही.
__ 'मंदा मोहेण पाउडा'१६४ मूर्ख जीव मोहाने आवृत्त राहतात. मोह जेव्हा अधिक खोल होतो तेव्हा त्याला सम्मोह म्हणतात. सम्मोहाने व्याप्त भावनेला 'सम्मोही भावना' म्हटले गेले आहे.
शेवटी भाष्यकाराने ह्या सर्व भावनेच्या कुत्सित फळाचे वर्णन करताना लिहले आहे की, ह्या भावनेने प्रभावित होणारा, चिंतन करणारा, अभ्यास करणारा संयत पुरुषही कांदर्प इत्यादी देवगतीला प्राप्त करतो. आणि तेथून च्यूत होऊन संसारसागरामध्ये भटकत राहतो.
उपरोक्त सर्व भावना अप्रशस्त आहेत. इथे अप्रशस्त आणि प्रशस्त भावनेचे जे वर्णन आले आहे. त्यासंबंधी हे जाणण्यायोग्य आहे की जेव्हा साधक प्रशस्ततेकडे उन्मुख होतो तेव्हा अप्रशस्तता स्वतःच सुटून जाते. सत्यभाषण केल्याने असत्य राहत नाही. हिंसक जीवन नसेल तर अहिंसक भावना स्वतःहूनच प्रकट होते. अपरिग्रह स्वीकारताच परिग्रह राहत नाही. इथे ही गोष्ट सूक्ष्मतेने समजण्यासारखी आहे की विवेचनाच्या दोन पद्धती आहेत- एक विधिमुखता आणि दुसरी निषेधमुखता. विधिमुखतेचे तात्पर्य 'शुभ' अथवा 'सत्'चे विधान करणे आहे. जसे सत्याचा स्वीकार करा, करुणा ठेवा, संतोष
धारण करा इत्यादी.
'शुभा'च्या विधेयात्मकतेच्या उपदेशाने अशुभाचे सुटणे पूर्वी सांगिल्याप्रमाणे स्वयं ध्य आहे. परंतु शुभ स्वीकारण्याच्या दिशेत साधकाच्या मनात उत्साह निर्माण